Home Breaking News मुंबईत इमारत कोसळली, ११ ठार ९ गंभीर

मुंबईत इमारत कोसळली, ११ ठार ९ गंभीर

0
मुंबईत इमारत कोसळली, ११ ठार ९ गंभीर

मुंबई : मुंबईतील (Mumbai) मालाड पश्चिमेकडील मालवणी भागातील इमारत दुर्घटनेत आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये 6 लहान मुलांचा समावेश आहे. तर 8 जण गंभीर जखमी झाले आहे. सध्या दुर्घटनास्थळी मुंबई महापालिका (BMC) आणि अग्निशमन दलाकडून ढिगारा हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. तर दुसरीकडे जखमींना मदतही केली जात आहे.