आरटीई प्रवेश प्रक्रिया या तारखेपासून सुरू

276

विदर्भ वतन न्युज पोर्टल – नागपूर, समाजातील आर्थिक दुर्बल व वंचित घटकातील बालकांसाठी शिक्षण अधिकार कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव असतात. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर टाळेबंदीमुळे सोडत जाहीर होऊन निवड झालेल्या बालकांची प्रवेश प्रक्रिया रखडली होती. आता कोरोनाची रुग्णसंख्या कमी होताच निवड झालेल्या बालकांची प्रवेश प्रक्रिया शुक्रवार ११ जूनपासून सुरू होणार असल्याचे शिक्षण विभागाने जाहीर केले आहे.
यंदा आरटीई अंतर्गत बालकांची निवड यादी दोन महिन्यांपूर्वीच जाहीर केली. त्यात ५ हजार ६११ बालकांची निवड झाल्याचे सांगितले जाते. मात्र कोरोनामुळे प्रवेश प्रक्रिया स्थगित केली. आता ११ ते ३0 जून पर्यंत निवड झालेल्या बालकांना शाळेत जावून आपला प्रवेश निश्‍चित करावा लागेल. शाळेत गर्दी टाळण्यासाठी पालकांच्या मोबाईलवर एसएमएसही पाठविला जाणार असल्याचे सांगितले जाते.
शाळानिहाय निवड झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या
विद्यार्थी, नागपूर शहर (यूआरसी १) २७२ शाळेत १८४८ विद्यार्थी, नागपूर शहर (यूआरसी २) ३९ शाळेत ६७९ विद्यार्थी, नागपूर (ग्रामीण) तालुक्यात १0२ शाळेत ९0८ विद्यार्थी, नरखेड १४ शाळेत ११४ विद्यार्थी, पारशिवनीत १७ शाळेत ११२ विद्यार्थी, रामटेकमध्ये १३ शाळेत १२७, सावनेरात ३४ शाळेत २२४ विद्यार्थी, उमरेडमध्ये २४ शाळेत २२२ विद्यार्थी, भिवापूर तालुक्यातील ५ शाळांमध्ये ४0 विद्यार्थी, हिंगण्यात ४0 शाळेत ३९३ विद्यार्थी, कळमेश्‍वर २६ शाळेत ११८ विद्यार्थी, कामठी ४0 शाळेत ३९१ विद्यार्थी, काटोल १९ शाळेत १६४ विद्यार्थी, कुही १५ शाळेत ९९ विद्यार्थी तसेच मौदा तालुक्यातील १९ शाळेत १७२ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.