
विदर्भ वतन न्युज पोर्टल – महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे टिकणार तसेच भविष्यात लोकसभा व विधानसभा निवडणुकीत सोबत काम करणारे असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज एका कार्यक्रमाप्रसेगी केले़ राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यामध्ये महत्वाची भूमिका निभावणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना आणि आपण एकत्र काम करु शकतो असं कोणाला पटले नसते असे म्हटलं आहे. आपण राज्याला वेगळ्या विचारांचे सरकार दिले असून पुढील पाच वर्ष हे सरकार टीकेल असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रवादीच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आपण राज्याला वेगळ्या विचारांचे सरकार दिले. शिवसेना आणि आपण एकत्र काम करु शकतो असं कोणला पटलं नसतं. पण आपण लोकांना पर्याय दिला आणि त्यांनी तो स्वीकारला. तिन्ही पक्षांनी योग्य पावलं टाकली आणि आज हे आघाडी सरकार चांगल्या रितीने काम करत आहे,ह्व असं कौतुक शरद पवारांनी यावेळी केले़ सरकार झाल्यानंतर किती दिवस टिकणार अशी चर्चा सुरु होती अशी आठवण करुन देताना हे सरकार टीकेल आणि पाच वर्ष टीकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रधानमंत्री मुख्यमंत्र्यांसोबत स्वतंत्र बसले आणि चर्चा केली असं सांगत लगेच वेगवेगळ्या शंका घेण्यात आल्या असं सांगत शरद पवारांनी यावेळी टीकाकारांना उत्तर दिले. शिवसेनेसोबत आपण कधी काम केलं नाही पण महाराष्ट्र शिवसेनेलासुद्धा कित्येक वर्षांपासून पाहत आहे. माझा यासंबंधीचा अनुभव विश्वास असणाराच आहे. हे सरकार टीकेल आणि पाच वर्ष काम करेल. नुसतंच काम करणार नाही तर लोकसभा आणि विधानसभेत एकत्रित काम करुन सामान्य जनतेचं देशात आणि राज्यात प्रतिनिधित्व करण्याचे काम करेल याबाबत शंका नाही, असे शरद पवार यांनी सांगितले.

