पिपरडोल येथे शॉर्टसर्किटमुळे घराला आग; लाखोंचे नुकसान

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/9957*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

145

पिपरडोल येथे शॉर्टसर्किटमुळे घराला आग; लाखोंचे नुकसान

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, उमरेड-पिपरडोल या गावी शॉर्टसर्किट झाल्याने घराला आग लागून घरातील जीवनावश्यक साहित्य जळून राख झाली. ही घटना बुधवार, ९ जून रोजी सकाळी आठ वाजताच्या दरम्यान घडली.
आकाशाच्या दिशेने धुरांचे लोर दिसताच गावातील नागरिकांनी बघावयास एकच गर्दी केली. यावेळी राष्ट्रवादी किसान सेलचे तालुकाध्यक्ष नीळकंठ पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. तसेच गावाचे तलाठी संजय जनबंधू यांनी मोक्यावर येऊन पंचनामासुद्धा केला. प्राप्त माहितीनुसार, रामदास गोविंदा सलाम (वय ५५) हे सकाळी कुटुंबासह शेतात काम करण्याकरिता गेले असता अचानक घरातील मीटरजवळ शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली. व त्यामध्ये घरातील जीवनावश्यक साहित्य टीव्ही, कुलर, पंखा, सोपा, दिवान, धान्य, कपडे संपूर्ण जळून राख झाले. सिलेंडरला वेळीच बाहेर काढल्याने खूप मोठा अनर्थ टळला. या आगीत सलाम परिवाराचे अंदाजे लाख रुपयांचे नुकसान झाले असून, शासनाने तत्काळ नुकसानभरपाई देऊन कुटुंबाला दिलासा द्यावा, अशी मागणी कुटुंबासह सरपंच मनीषा सुनील मांडवकर, ग्रामपंचायत सदस्य आशिष प्रेमदास गजघाटे, शीतल कोराम, जितेंद्र गजघाटे, यशवंत वाळते, संतोष गजघाटे, कवडू कोराम आदींनी मागणी केली आहे.