Home Breaking News एका महिलेने दिला १0 मुलांना जन्म

एका महिलेने दिला १0 मुलांना जन्म

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/9944*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

88 views
0

एका महिलेने दिला १0 मुलांना जन्म

गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद होणार!

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था/दरबन-दक्षिण आफ्रिकेत एका महिलेने १0 मुलांना जन्म दिला आहे. डॉक्टरांनी अधिकृतपणे याला दुजोरा दिल्यास हा एक विक्रम असणार आहे. एक महिन्यापूर्वीच माली देशातील महिलेने मोरक्कोमध्ये ९ मुलांना जन्म दिला होता. दक्षिण आफ्रिकेतील महिला गोसिअमे थमारा सितोले (वय ३७) या महिलेने १0 मुलांना जन्म दिला आहे. यामध्ये सात मुले आणि तीन मुलींचा समावेश आहे.
सितोलेचे पती टेबोगो त्सोत्सीने सांगितले की, ७ जून रोजी प्रिटोरियन रुग्णालयात सिजेरियन शस्त्रक्रियेने प्रसुती झाली. डॉक्टरांनी गरोदरपणाच्यावेळी केलेल्या तपासणीत सहा मुले असल्याचे टेबोगो यांना सांगितले होते. त्यानंतर आठ मुले असल्याचे सांगितले. मात्र, प्रसुतीवेळी १0 मुलांचा जन्म झाला. या आफ्रिकन जोडप्याला याआधीच जुळे मुले आहेत. टेबोगो त्सोतेत्सी सध्या बेरोजगार आहेत. टेबोगो यांनी सांगितले की, मुलांच्या जन्मानंतर मी भावूक झालो असून आनंदी आहे.
याआधी आफ्रिकन देश मालीमधील एका महिलेने ९ बाळांना जन्म दिला होता. प्रसुतीनंतर आई आणि नवजात बालके सुखरूप असल्याची माहिती माली सरकारने दिली. माली सरकारने २५ वर्षीय हलीमाला चांगले उपचार मिळावे व सुखरूप प्रसुती व्हावी यासाठी मोरक्को येथे पाठवले होते. या महिलेच्या गर्भात सात भ्रुण असल्याचे वैद्यकीय चाचणीत म्हटले गेले होते. मात्र, तिने ९ बाळांना जन्म दिला.