Home Breaking News आदिवासी समाजाच्या विविध समस्या सोडविण्यासाठी मनपा महापौर दयाशंकर तिवारी यांचेसोबत बैठक

आदिवासी समाजाच्या विविध समस्या सोडविण्यासाठी मनपा महापौर दयाशंकर तिवारी यांचेसोबत बैठक

0
आदिवासी समाजाच्या विविध समस्या सोडविण्यासाठी मनपा महापौर दयाशंकर तिवारी यांचेसोबत बैठक
विदर्भ वतन न्युज पोर्टल, नागपूर : भारतीय जनता पार्टी आदिवासी आघाडी  महानगरद्वारा 07 जून  रोजी, अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग यांना प्राप्त  समस्यांचे तात्काळ निवारण करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले. एक तास चाललेल्या बैठकीत  विविध समस्यांवर चर्चा करून त्या सोडविण्याचे आश्वासन देण्यात आले. आदिवासी समाजासाठी महाविकास आघाडी सरकार ने कोरोना महामारी मध्ये खावटी योजना अमलात आणली पण ही योजना फक्त कागदावर असून या योजनेची घोषणा होवून शासकिय परिपत्रक निघून महीने लोटले  तरी पण योजना नागरीकांपर्यंत पोहोचली नाही. लाभार्थ्यांना त्वरित योजनेचे लाभ देण्यात यावा व ज्या लाभार्थ्यांनी नोंदणी केली नसेल त्यांचे सुद्धा नोंदणी करुन घेण्यात यावे. येत्या 2 वर्षा पासून नामांकित शाळा प्रवेश प्रक्रिया कोरोनाच्या महामारी मुळे होऊ शकली नाही. ती तात्काळ सुरू करावी व पाल्यांना या बाबतीत पूर्ण मार्गदर्शन करावे. क्रांतीसुर्य महामानव बिरसा मुंडा यांनी समाजात नवी क्रांती घडवून आणली व गोंड राजे बक्त बुलंद शहा उईके यांनी नागपूर नगरीची स्थापना केली त्यांच्या पुतळयाचे जतन करण्यासाठी आदिवासी विकास विभाग व नागपूर महानगर पालिकेनी यांचे पालकत्व स्विकारले पाहिजे. कोरोना महामारीमध्ये लागणाऱ्ये रेमडीसीवर इंजेक्शन चा खर्च आदिवासी विकास विभागा मार्फ़त देण्यात येणार होता पण समाज बांधवापर्यंत ही योजना पोहोचविण्यास प्रशासन अयशस्वी ठरले. तसेच आदिवासी विकास विभागा मार्फ़त होणारी टेंडर प्रक्रियेमध्ये आदिवासी महिला बचत गट व संस्था यांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे.यासह आदी समस्यांवर  महापौर दयाशंकर जी तिवारी यांचे सोबत चर्चा करून  निवेदन देण्यात आले. याप्रसंगी शिष्टमंडळात खासदार विकासजी महात्मे, आमदार प्रवीण दटके, माजी महापौर मायाताई इवनाते, उपाध्यक्ष विवेक नागभिरे, शहर अध्यक्ष रविंद्र पेंदाम, नगरसेवक संजय बंगाले, नगरसेवक प्रमोद कौरती, महामंत्री बाल्या बोरकर, संघटन महामंत्री सुनील मित्रा, महामंत्री आघाडी दिलीप मसराम, आघाडी पश्चिम नागपुर अध्यक्ष आकाश मडावी, सुनेश कुळमेथे, श्याम कार्लेकर, आकाश मडावी यांच्यासह आदी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.