रुग्णालयात कोण गंभीर आहे पाहण्यासाठी बंद केला ऑक्सिजन पुरवठा! २२ जणांचा मृत्यू?

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/9918*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

180

रुग्णालयात कोण गंभीर आहे पाहण्यासाठी बंद केला ऑक्सिजन पुरवठा! २२ जणांचा मृत्यू?

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : नवी दिल्ली – संकटकाळात आपण कसे वागावे यासाठीच प्रयोग करण्यासाठी विविध क्षेत्रात मॉक ड्रील करण्यात येते. पण या प्रयोगातुन कोणाचा तरी जीव वाचवण्याची शिकवण देण्यात येते. मात्र उत्तर प्रदेशमध्ये मॉक ड्रील जीव वाचविण्यासाठी नाहीतर जीव घेण्यासाठी करण्यात आला आहे. आग्रा येथील एका नामांकित रुग्णालयाच्या चौकशीचे उत्तर प्रदेशमधील आरोग्य विभागाने आदेश दिले आहेत. सोशल मीडियावर या रुग्णालयाच्या मालकाचा एका व्हिडीओ व्हायरल झाला असून, ज्यामध्ये त्याने २६ एप्रिल रोजी आपण रुग्णालयात अत्यावस्थ अवस्थेत ऑक्सिजनची आवश्यकता असणाऱ्या रुग्णांचा ऑक्सिजन पुरवठा पाच मिनिटांसाठी बंद केल्याचा दावा केला आहे. यामधून कोण वाचू शकते हे पाहण्यासाठी हा प्रयोग आपण केल्याचे हा मालक व्हिडीओत सांगताना दिसत आहे. या धक्कादायक घटनेनंतर कोरोनाबाधित आणि कोरोनाची बाधा न झालेल्या पण ऑक्सिजनवर असणाऱ्या २२ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. ‘इथे ऑक्सिजनचा मोठा तुटवडा होता. मोदीनगरमध्ये ऑक्सिजन उपलब्ध नव्हता. आम्ही रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णांना डिस्चार्ज देतो. त्यांना घरी घेऊन जा असं सांगत होतो पण कोणीही त्यासाठी तयार नव्हते. म्हणून मग मी एखाद्या मॉक ड्रीलप्रमाणे प्रयोग करण्याचा निर्णय घेतला. आम्ही २६ एप्रिल रोजी सकाळी सात वाजता ऑक्सिजनचा पुरवठा पाच मिनिटांसाठी बंद केला. त्यानंतर २२ रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि त्यांचे शरीर निळे पडू लागले.

या प्रयोगामधून ऑक्सिजनचा पुरवठा या रुग्णांना केला नाही, तर ते जगू शकणार नाही, हे स्पष्ट झाल्यानंतर आम्ही अतिदक्षता विभागातील इतर ७४ रुग्णांच्या नातेवाईकांना ऑक्सिजन सिलेंडरची सोय करण्यास सांगितले, अशी माहिती व्हायरल व्हिडीओमध्ये पारस रुग्णालयाचा मालक असणाऱ्या अरिंजय जैन यांनी दिल्याचे दिसत आहे. राष्ट्रीय महामार्ग दोनवर हे रुग्णालय असून हा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. कोणते रुग्ण क्रिटीकल अवस्थेत आहेत हे जाणून घेण्यासाठी आणि त्यांना योग्य उपचार देण्यासाठी आम्ही हे मॉक ड्रील केले होते. २६ एप्रिल रोजी कोरोनाचे चार तर २७ एप्रिल रोजी तीन रुग्ण दगावल्याचा दावा जैन यांनी केला आहे. ऑक्सिजनच्या पुरवठ्या अभावी २२ जणांचा मृत्यू झाला का असा प्रश्न विचारला असता जैन यांनी, मला अगदी योग्य आकडा ठाऊक नसल्याचे उत्तर दिले. आग्रा येथील मुख्य आरोग्य अधिकारी, डॉक्टर आर. सी. पांड्ये यांच्याकडे यासंदर्भात चौकशी करण्यात आली असता त्यांनी, आम्ही या व्हायरल व्हिडीओची दखल घेतली आहे. एक समिती या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आल्याची माहिती दिली. या रुग्णालयामध्ये मोठे आयसीयू वॉर्ड आहे. इतरांचा मृत्यू झाला असावा. आम्ही व्हिडीओची सत्यता पडताळून पाहत असल्याची माहिती जिल्हाधिकारी प्रभू एन सिंग यांनी दिली. आग्रा येथील जीवनी मंडी परिसरातील मयंक चावला यांच्या आजोबांचे या रुग्णालयामध्ये २६ एप्रिल रोजी निधन झाले. पारस रुग्णालयामध्ये त्या दिवशी अनेक रुग्णांचे निधन झाले आहे मात्र प्रकरणामध्ये आम्हाला कोणतीही अधिकृत तक्रार मिळालेली नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.