Home Breaking News नवनीत राणा यांना हायकोर्टाचा हादरा! जात प्रमाणपत्र रद्द व २ लाखांचा दंड

नवनीत राणा यांना हायकोर्टाचा हादरा! जात प्रमाणपत्र रद्द व २ लाखांचा दंड

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/9908*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

66 views
0

नवनीत राणा यांना हायकोर्टाचा हादरा! जात प्रमाणपत्र रद्द व २ लाखांचा दंड

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : मुंबई – अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना आज मुंबई उच्च न्यायालयाने मोठा हादरा दिला. त्यांचे जात प्रमाणपत्र रद्द ठरवून त्यांना २ लाखांचा दंड ठोठावला. यामुळे राणा यांची खासदारकी धोक्यात आली आहे. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती धनुका आणि न्यायमूर्ती बिश्त यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला.

गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांचा अपक्ष उमेदवार नवनीत राणा यांनी पराभव केला होता. अमरावतीतून त्या निवडून आल्या होत्या. मात्र त्यांच्या या निवडीला आव्हान देणारी याचिका पराभूत उमेदवार आनंदराव अडसूळ आणि सुनील भालेराव यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केल्या होत्या. त्यात नवनीत राणा यांनी निवडणूक अर्जासोबत जोडलेले अनुसूचित जाती जमाती बद्दलचे प्रमाणपत्र बोगस असल्याचा आरोप त्यांनी केला होता. जात प्रमाणपत्र समितीसमोरही त्यांनी जातीचा खोटा दावा केला, असाही आरोप त्यांनी याचिकेत केला होता. त्यांनी समितीसमोर दाखल केलेली मूळ कागदपत्रे सादर करण्याची मागणी त्यांनी न्यायालयात केली होती.

न्यायालयाने ती मान्य करून खासदार राणा यांना कागदपत्रे सादर करण्याचा आदेश दिला होता. यावर आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र अवैध असल्याचा निकाल दिला. याशिवाय त्यांना २ लाखांचा दंड ठोठावला. त्यामुळे खासदार राणा यांना मोठा हादरा बसला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला नवनीत राणा सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची शक्यता आहे.