
।।रक्षण भूमातेचे।।
पृथ्वी आपली माता
पर्यावरण हा श्वास असे
भोवतालचे पशु-पक्षी
झाडे ही सगेसोयरे असे
गरजेपूर्तेच घेईन मी
त्यांना ओरबडणार कसे?
वृध्दी त्यांची करणार मी
संवर्धन माझे कर्तव्य असे
भूमातेने अपार दिले मज
जाणीव याची मजला असे
काटकसरीने वापरेल मी
व्यर्थच खर्चेल सांगा कसे?
पशू,पक्षी,झाडे,जंगले मी
सांगा तयांना तोडणार कसे?
वसूंधरेचेच या मी लेकरू
शेख चिल्ली मी मुळीच नसे
हवा,पाणी,जमीन माझ्या
या भूमातेचे अलंकार असे
रक्षणास त्या जबदार मी
तव रक्षण माझेच कर्म असे
या मातेचे संवर्धन हे मी
आनंदाने सदैव करणार असे
संमृध्द तिला करणार मी
माझी ही संमृध्दी त्यात असे
© कवी: प्रल्हाद कोलते
उल्हासनगर-०४
भ्रमण ध्वनी:९७६६९०२४९९

