पाकिस्तानात दोन एक्स्प्रेसची धडक; 30 जणांचा मृत्यू

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/9889*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

182

पाकिस्तानात दोन एक्स्प्रेसची धडक; 30 जणांचा मृत्यू

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : सिंध – पाकिस्तानात भीषण रेल्वे अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील डहरकी जवळ सर सैय्यद एक्स्प्रेस आणि मिल्लत एक्स्प्रेस एकमेकांना धडकल्या आहेत. या दुर्घटनेत आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मिल्लत एक्स्प्रेस कराचीहून सरगोधा आणि सैय्यद एक्स्प्रेस रावळपिंडीहून कराचीला जात होती. आज सकाळी घोटकी भागातल्या डहरकीजवळ या दोन एक्स्प्रेस एकमेकांना धडकल्या आणि मिल्लत एक्स्प्रेसचे 8, तर सर सैयद एक्स्प्रेसचे इंजिनसह तीन डब्बे पटरीहून खाली घसरले. तसेच काही डबे दरीत कोसळले. या दुर्घटनेत 30 जणांचा मृत्यू झाला असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर रेल्वेच्या डब्यात अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ट्विट करत म्हटले आहे, ‘घोटकी येथे झालेल्या घटनेमुळे मला हादरा बसरला आहे. या अपघातात 30 जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींवर उपचार करण्यासाठी आणि मृतांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी आरोग्यमंत्र्यांना निर्देश दिले आहेत. तसेच याप्रकरणी रेल्वे सुरक्षेतील दोष शोधण्यासाठी चौकशीचे आदेश दिले आहेत.’