आमदार राजूभाऊ पारवे यांनी कोविड-१९ मुळे दगावलेल्या कुटुंबीयांना भेट देत आर्थिक मदत दिली

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/9867*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

144

आमदार राजूभाऊ पारवे यांनी कोविड-१९ मुळे दगावलेल्या कुटुंबीयांना भेट देत आर्थिक मदत दिली

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, भिवापूर – शुक्रवार ला भिवापूर येथे कोविड १९ ने दगावलेल्या कुटुंबीयांना आमदार राजूभाऊ पारवे यांनी भेट देत आर्थिक मदत दिली.
पालकतत्व मोहीम मा. आमदार राजूभाऊ पारवे यांनी सुरु केली आहे. कोविड या महामारीने दगावलेल्या प्रत्येक कुटुंबाच्या घरी जाऊन भेट देत सांत्वन करत तुमच्या  दु:खात सहभागी आहो.
कोरोनाने बरेचसे परिवार उध्वस्त झालेले आहे व या उदभवलेल्या परिस्थितीशी लढत आहे.
त्यांना आधार हवा म्हणून एक पाऊल समोर घेत तुमचा मुलगा म्हणून किंवा तुमचा भाऊ म्हणून उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार राजुभाऊ पारवे यांनी पुढाकार घेऊन आमदार मोहद्यांनी पालकत्व मोहीम स्वीकारला आहे.
आज भिवापूर येथे सुलभा ज्ञानेश्वर रासेकर यांचे पती, रमेश शंकर सुसनकर यांची आई, लता हेमंत पानतावणे यांचे पती, वैशाली प्रमोद मदुरकर यांचे पती, प्रतीक विलास ठाकरे यांची आई, रीना राजेंद्र सोनटक्के यांचे पती, कोरोनामुळे दगावले या परिवाराला आमदार राजुभाऊ पारवे यांनी भेट देत आर्थिक मदत केली.
या वेळी सभापती ममता शेंडे, जि.प. सदस्य, शंकर डडमल, उपसभापती कृष्णा घोडेस्वार, उपविभागीय पोलिस अधिकारी भीमराव टेळे, पोलीस निरीक्षक महेश भोरटेकर, शहर अध्यक्ष दिलीप गुप्ता, माजी नगराध्यक्ष लव जनबंधु, किरण नागरिकर, माजी नगरसेवक वर्षा ठाकरे, मंजूषा समर्थ, वसंता ढोणे, तुळशीदास शेंडे, नितीन रघूशे, छायाताई ढोणे,  प्रेम ठाकरे, पुरुषोत्तम फाये, कवडू नागरीकर, रमेश भजभूजे, सुनील पौणिकर,  वैभव लाखे, उपस्थित होते.