Home आरोग्य कोरोना : एक आव्हान

कोरोना : एक आव्हान

0
कोरोना : एक आव्हान

कोरोना : एक आव्हान

सारे जग कोविड महामारी ने ग्रासले आहे. अचानक आलेले हे संकट कित्येक लोकांना आपल्या विळख्यात सामाऊन घेत आहे. सर्व जग भयभीत झाले. काय करावे सुचत नाही. बेरोजगार वाढला. मानसिक रोग वाढले. याचा परिणाम सर्व व्यवहार कोसळले.
भय कंपीत जग झाले
शोधण्या निघालो शांती
दहशतीचे रुजले बीज
जाहली विषारी धरती.
अशा वातावरणात सारे जीव सुरक्षित राहवे यासाठी पोलिस,डॉक्टर,परिचारिका,समाज सेवक अथक परिश्रम करीत आहे त्यांच्या कार्याला मानाचा सलाम. रक्ताळलेले पाय,थकलेले शरीर,उपासाची आग,डोक्यावर ओझे असे जागोजागी अडकले. हाल हाल करत जगण्याच्या ओढीने गावाकडे निघाले. केवळ एका छोट्या विषाणुचा हा कहर पूर्ण जगाला त्रासून गेला. अनेक कार्यकर्ते आपल्या जिवाला मुकले. त्यांचे लेकरं पोरके झाले.. तिकडे काही लोक स्वार्थापोटी आंधळी झाली. तर काही अविरत सेवेमध्ये रममाण झाली. यातून अनेक चांगले वाईट अनुभव पण आलेत. शासन स्तरावर प्रयत्न करत असताना बरेच लोक उगीच फिरत होते तर काही कामात व्यस्त होते. यावेळी वाटायचे की मी या समाजाचे काही देणे लागतो, हे भान मी जपले पाहिजे. किती करुण प्रसंग कोरोनाने दिले. कोणाचे छत्र हरवले तर कोणाचे बाळ वाटेत गेले. अशावेळी माणसातील माणुसकी जागी झाली. अनेक मदतीचे हात पुढे आले. घासातील घास देण्याची आमची संस्कृती जागी झाली. पण काही ठिकाणी विदारक चित्र पण दिसले. या काळात सगे सोयरे पण दूर गेले. अशावेळी जात-पात धर्माच्या भिंती तोडून दुसरी माणसे मदतीला आली. ही शिकवण कोरोनाने दिली. जीवनच बदलून गेले. एक अनुभव तर असा होता की कोरोना झाल्यामुळे स्वकीय घाबरले पण एका मुस्लीम बांधवाने अग्नी दिला. संकुचित पणाची भिंत मोडण्याच उदाहरण पहायला मिळाले. असे असले तरी या काळात श्रमिकाना काम, भुकेल्यंना अन्न, निरश्रितन्ना आश्रय देण्याचे काम अत्यंत आवशक होते. आणि आहे. अनेक संघटना आणी सेवाव्रती संस्था सेवा देत आहे अणि दिल्या पण. या देशातील कोटी जनता निस्वार्थपणे पुढे आली तर कितीही मोठे संकट आपण पेलू शकतो. नुसते भाषण किंवा लिहूुन हे होणार नाही. तर प्रत्यक्ष लढण्याचे पाऊल पुढे पडले पाहिजे. केवळ संकट आले म्हणून रडत बसणे योग्य नाहीच तर या देशातील तरुणाईने मिळेल ते काम करून सर्व कार्यकर्त्याना साथ दिली तर ब-याच समस्या सुटू शकतात. कदचित ही स्थिती आपल्याला बदलविण्यासाठी तर आली नसेल नं?असे वाटून जाते.Ñ
अहंकार द्वेष नष्ट करून जे जे शक्य आहे ते आपण करू शकतो. किमान जागर तर करुच शकतो यासाठी तुमची जीवन शैली बदलावी लागेल. आरोग्याकडे प्रत्येकाने लक्ष द्यावे लागेल. तरच सर्व वातावरण बदलेल. केवळ शासन आणी डॉक्टर यांच्यावर ढकलून कोणतेही काम होणार नही. तर आपला जीव आपला परिवार अमूल्य आहे हे समजून आपण वागलो तर कुणावरही भार येणार नाही. जे सेवा करतात त्याना सहकार्य करून आपण समाजाचे दीपस्तंभ होऊ शकतो. अनेक संकटे येतील, जातील पण आपण सजग असावे. मानसाने माणसाशी माणसासम वागणे हीच आपली भावना असावी. मला या प्रसंगी कवी अशोक थोरात यांच्या ओळी आठवतात.
छळून घ्या संकटांनो
संधी पुन्हा मिळणार नाही
कापराचा देह माझा जळुनि पुन्हा
जळणार नाही
सहिन मी आनंदाने तुमचे
वर्मी घाव अशीच नेईन
किनार्यावर तुटलेली नाव.
मार्ग बिकट आला तरी मागे मी
वळणार नाही. अशी हिम्म्मत आणी धीर ठेऊन कोरोना हरवू या. ..

-अरुणा भोंडे
नागपुर.
साहित्यिक आणी सामाजिक कार्यकर्ता.