Home Breaking News अशा प्रकारे घरबसल्या बनवा रेशनकार्ड

अशा प्रकारे घरबसल्या बनवा रेशनकार्ड

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/9852*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

151 views
0

अशा प्रकारे घरबसल्या बनवा रेशनकार्ड

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : नवी दिल्ली : कोरोनाच्या संकट काळात केंद्र तसेच राज्य सरकार रेशनवर मोफत धान्य देत आहे. पण तुमच्याकडे जर अद्यापही रेशनकार्ड नसेल तर तुम्ही आता घरबसल्या रेशनकार्ड बनवू शकता. स्मार्टफोनवरून ऑनलाइन रेशन कार्डसाठी अप्लाय करू शकता. सर्व राज्यांनी यासाठी आपल्या स्वतःच्या वेबसाईट बनवल्या आहेत. तुमच्या राज्याच्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन रेशन कार्डसाठी अप्लाय करू शकता.

अशा प्रकारे करु शकता अप्लाय

  • सर्वप्रथम तुम्ही ज्या राज्यात रहाता त्या राज्याच्या अधिकृत वेबसाइटवर जा. जर महाराष्ट्राचे अर्जदार असाल. तर mahafood.gov.in वर क्लिक करून अर्ज करू शकतात.
  • त्यानंतर अ‍ॅप्लाय ऑनलाइन फॉर रेशन कार्डच्या लिंकवर क्लिक करा.
  • ऑनलाइन रेशन कार्ड बनवण्यासाठी आयडी प्रूफ म्हणून आधार कार्ड, वोटर आयडी, पासपोर्ट, हेल्थ कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी देता येईल.
  • रेशन कार्डसाठी अर्ज शुल्क 5 रुपयांपासून 45 रुपयांपर्यंत आहे. अर्ज भरल्यानंतर शुल्क जमा करा आणि अ‍ॅप्लीकेशन सबमिट करा.
  • फील्ड व्हेरिफिकेशन झाल्यानंतर जर तुमचा अर्ज योग्य आढळला तर रेशनकार्ड तयार होईल.
  • यासाठी फक्त भारतीय नागरिक अर्ज करू शकतात. 18 वर्षापर्यंतच्या मुलांचे नाव पालकांच्या कार्डमध्ये असते. 18 वर्षावरील आपले वेगळे कार्ड बनवू शकतात.

ऑनलाईन रेशन कार्डसाठी ही कागदपत्र आवश्यक
आयडी प्रूफसाठी – आधार कार्ड, वोटर आयडी, पासपोर्ट, सरकारद्वारे जारी कोणतेही आय कार्ड, हेल्थ कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स. तसेच पॅन कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, उत्पन्नाचा दाखला. पत्त्याचा पुरावा – विज बिल, गॅस कनेक्शन बुक, बँक स्टेटमेंट, रेंटल अ‍ॅग्रीमेंट.