Home Breaking News ‘ड्रिमगर्ल’मधील अभिनेत्रीचा कोरोनामुळे मृत्यू, आयुष्यमान खुराणासोबतही केलं होतं काम

‘ड्रिमगर्ल’मधील अभिनेत्रीचा कोरोनामुळे मृत्यू, आयुष्यमान खुराणासोबतही केलं होतं काम

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/9848*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

59 views
0

‘ड्रिमगर्ल’मधील अभिनेत्रीचा कोरोनामुळे मृत्यू, आयुष्यमान खुराणासोबतही केलं होतं काम

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : मुंबई – कोरोनाच्या काळात अनेक सलिब्रिटींनाही संसर्ग झाला, तर अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अशातच आणखी एका अभिनेत्रीचं कोरोनाने निधन झालं आहे. रिंकू सिंग निकुंभ असं तिचं नाव आहे. तिने ‘ड्रिमगर्ल’सह ) आणखी काही चित्रपटांत काम केलं होतं.

अभिनेता आयुषमान खुरानासोबत काम केलेली रिंकू ही छोट्या पडद्यावरील चिडियां घर या मालिकेतून नावारुपास आली होती. ती एक थिएटर आर्टिस्ट होती. रिंकूची चुलत बहीण चंदा सिंग हीने रिंकूच्या निधनाची बातमी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.

चंदाने सांगितलं की रिंकूचा 25 मे ला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. ती घरातच कॉरन्टाइन होऊन औषध घेत होती मात्र तिचा ताप कमी होत नव्हता. त्यामुळे तिला दवाखान्यात भरती करण्यात आलं. तिच्या प्रकृतीत सुधारणा होत होती. मात्र अचानक ती सगळ्यांना सोडून गेली.

चंदाने पुढे सांगितलं की रिंकू एक अस्थमाची पेशंट होती. तिने 7 मे ला कोव्हॅक्सिन लस देखिल घेतली होती. रिंकूच्या घरातील अनेकांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे रिंकूलाही लागण झाली. रिंकू एक आनंदी व्यक्ती होती. असही ती म्हणाली.

अनेक चित्रपटात दिसलेल्या रिंकूचा हॅलो चार्ली हा अमॅझॉन प्राइमचा शेवटचा चित्रपट ठरला. चिडियाघर शिवाय ती बालवीर या मालिकेतही दिसली होती. सिनेसृष्टीतील अनेकंनी कोरोनाची लागन झाली आहे. तर काहींच यात निधन सुद्धा झालं आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता रोहीत बोहरा याचही कोरोनाने निधन झालं होत.