
आरोग्य उपकेंद्र खैरी येथे म्युकर मायकोसिस वर मार्गदर्शन
विदर्भ वतन, नागपूर : गुरुवारी आरोग्य उपकेंद्रे खैरी येथे जे कोरोना रुग्ण बरे झाले त्यांची म्युकरमायकोसिस रोगावरती मात करण्याकरिता त्या सर्व रुग्णाची ब्लड टेस्ट व युरिन टेस्ट करण्यात आली.
त्या मध्ये काही रुग्णाचे शुगर लेवल वाढल्याचे दिसून आले. त्यांना प्रतिबंधात्मक उपाय करावे व म्युकरमायकोसिस हा रोग होऊ नये या करिता त्यांना आरोग्य वर्धनी डा. वैशाली गोंनाळे व आरोग्य सेविका वनिता नेवारे, आरोग्य सेवक तुषार मून यांनी योग्य ती माहिती दिली. खैरी येथील सरपंच बंडू कापसे यांनी सर्व आरोग्य अधिकारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस या सर्वांना गाव कोरोना मुक्त झाले आहे तरी सतर्कतेचा ईशारा देऊन सर्वांची काळजी घेण्याची सांगितले.त्या वेळेस उपस्थित ग्रा.सचिव निलकंठ देवगडे, उपसरपंच व सदस्य गण तसेच सर्व कर्मचारी उपस्थित होते.

