Home Breaking News जागतिक बँकेच्या सल्लागारपदी डिसले गुरुजींची नियुक्ति

जागतिक बँकेच्या सल्लागारपदी डिसले गुरुजींची नियुक्ति

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/9834*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

58 views
0

जागतिक बँकेच्या सल्लागारपदी डिसले गुरुजींची नियुक्ति

विदर्भ वतन, वृत्तसंस्था/मुंबई : ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय शिक्षक रणजितसिंह डिसले यांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. जागतिक बँकेने सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती केली आहे.
डिसले गुरुजींची जून २0२१ ते जून २0२४ अशा तीन वर्षांच्या कालावधीसाठी त्यांची नेमणूक करण्यात आली आहे. जागतिक बँकेच्या वतीने जगभरातील शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी ग्लोबल कोच नावाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. जगभरातील मुलांच्या शैक्षणिक संपादणूक पातळीमध्ये वाढ करण्याच्या हेतूने जगभरातील शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमात अधिक एकसूत्रता आणणे, शिक्षकांना कालसुसंगत प्रशिक्षण देणे, प्रशिक्षणाच्या माध्यमातून शिक्षकांमधील नेतृत्वगुण विकसित करणे आदी उद्दिष्टे ठरवण्यात आलेली आहेत. ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी जगभरातील १२ व्यक्तींची सल्लागार म्हणून निवड केली आहे.
युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर हा सात कोटींचा पुरस्कार सोलापूरच्या परितेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतले शिक्षक रणजीतसिंह डिसले यांना प्रदान करण्यात आला. लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये झालेल्या कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेते स्टिफन फ्राय यांनी यासंदर्भातली घोषणा केली. असा पुरस्कार मिळवणारे रणजीतसिंह डिसले हे पहिले भारतीय शिक्षक ठरले आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाची गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चा आहे.