Home Breaking News महिला वरिष्ठ लिपिकास लाच घेताना रंगेहात अटक

महिला वरिष्ठ लिपिकास लाच घेताना रंगेहात अटक

0
महिला वरिष्ठ लिपिकास लाच घेताना रंगेहात अटक

महिला वरिष्ठ लिपिकास लाच घेताना रंगेहात अटक

विदर्भ वतन,नागपूर : दुय्यम निबंधक कार्यालय हिंगणा येथील वरिष्ठ लिपिक महिलेला १५ हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या पथकाने गुरुवारी रंगेहात पकडले. अलका रवींद्र फेंडर, असे आरोपी महिला वरिष्ठ लिपिकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, प्रकरणातील तक्रारदार हे वंजारी ले आऊट, यशोधरानगर येथील रहिवासी आहेत. ते व्यवसायाने वकील आहेत. महाजनवाडी वानाडोंगरी तह. हिंगणा येथील मोकळी जागा त्यांचे पक्षकार यांना खरेदी करायची असल्याने फियार्दी यांनी त्यांच्याकडून वकालतनामा लिहून घेतला. पक्षकाराचे खरेदीसंबंधीचे सर्व कागदपत्र फियार्दी पाहतात. पक्षकार यांच्यावतीने फियार्दी वकील यांनी मोकळी जागा विकत घेण्याचा सौदा करून त्याबाबत दोन्ही पक्षकार यांनी सांगितल्याप्रमाणे दस्ताऐवज तयार करून दुय्यम निबंधक कार्यालय हिंगणा येथील वरिष्ठ लिपिक अलका रवींद्र फेंडर यांना दिले. पण, वरिष्ठ लिपिक अलका फेंडर यांनी खरेदी केलेल्या जागेचे पक्के विक्रीपत्र नोंदणीकृत करून देण्याकरिता २0 हजार रुपयांची मागणी केली.
फिर्यादीना अलका फेंडर यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येथील कार्यालयात तक्रार नोंदविली. लाचलुचपत विभागाच्या पोलिस निरीक्षक संजीवनी थोरात यांनी मिळालेल्या तक्रारीची शहानिशा करून सापळा कारवाईचे आयोजन केले. त्यामध्ये पडताळणीदरम्यान आरोपी वरिष्ठ लिपिक अलका फेंडर यांनी तक्रारदार वकिलाला पक्षकाराने करेदी केलेल्या जागेचे विक्रीपत्र नोंदणीकृत करून देण्याकरिता २0 हजार रु. लाचेची मागणी करून तडजोडअंती १५ हजार रु. लाच रक्कम स्वत: दुय्यम निबंधक कार्यालय, हिंगणा येथे स्वीकारत असताना त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभगाच्या पथकाने रंगेहात पकडले.