मामाने केला भाच्याचा खून

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/9824*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

250

मामाने केला भाच्याचा खून

विदर्भ वतन,नागपूर : सात वर्षांपासून बेपत्ता असलेली आई आणि दोन बहिणींचा पत्ता विचारणा-या भाच्याला त्याच्या सख्ख्या मामाने डोक्यावर वार करून खून केल्याची घटना गुरुवारी वाडी हद्दीत एफ्कॉन कंपनीमागे डिफेन्स येथे उघड झाली. अतुल लष्कर (१७) असे मृताचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, वॉर्ड क्र. ३४, जनसेवा हॉटेलजवळ, नीलडोह येथे बाबासाहेब रामाजी लष्कर हे त्यांचा १७ वर्षांचा मुलगा अतुल याच्यासोबत रहायचे. तर अतुल हा कँटीनमध्ये काम करायचा. कँटीन बंद असल्याने तो सध्या रिकामा होता. तर त्याचे वडील जवळपासच्या कंपनीत काम करतात. त्यांची पत्नी आणि दोन मुली सात वर्षांपासून बेपत्ता आहेत. अतुल नेहमी त्याची आई व बहिणी कोठे आहेत, असे त्याच्या मामाला विचारायचा. यावरून त्याचा आणि त्याच्या मामाचा वाद होत असे. अतुलचा मामा आरोपी संदीप रमेश सायकाळ रा. वानाडोंगरी याचा मागच्या वषीर्ही याच कारणावरून अतुलसोबत वाद झाला होता. २0 मे रोजी पुन्हा अतुलचा आरोपी संदीप सोबत वाद झाला. वादाचे पर्यावसन मारहाणीत झाले. त्या गोष्टीचा राग आरोपीच्या मनात खदखदत होता. बुधवारी (ता.२) रात्री ८ वाजतापासून अतुल बेपत्ता झाला होता. त्यामुळे त्याची शोधाशोध सुरू होती.
गुरुवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास अतुलचा मृतदेह एफ्कॉन कंपनीच्या मागे मोकळ्या जागेत पडलेला दिसला. त्याच्या डोक्यावर अवजाराने वार करून त्याचा खून करण्यात आला होता. याबाबत स्थानिक लोकांनी वाडी पोलिसांना माहिती दिली. काही वेळेतच मृताची ओळख पटली. त्यानंतर मृताच्या वडिलांनी त्याच्या मामावर संशय व्यक्त केला.
आरोपीविरुद्ध आधीपण मृताला धमकाविल्याची तक्रार नोंदविली असल्याने पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत त्याची चौकशी सुरू केली. याप्रकरणी मिळालेल्या तक्रारीवरून वाडी पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली आहे.