Home आंतरराष्ट्रीय बिग बी झाले सनी लिओनीचे शेजारी

बिग बी झाले सनी लिओनीचे शेजारी

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/9811*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

95 views
0

बिग बी झाले सनी लिओनीचे शेजारी

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : मुंबई- बॉलीवूड कलाकारांना मिळणारा पैसा, त्याच्या गाड्या, घरे या संदर्भातल्या बातम्या नेहमीच आवडीने वाचल्या जातात. मुंबईत अलिशान पाच घरांचे मालक असलेले बिग बी म्हणजे अमिताभ बच्चन यांनी आणखी एका अलिशान डुप्लेक्सची खरेदी केली आहे. विशेष म्हणजे याच इमारतीत काही दिवसांपूर्वी बॉलीवूड मधील चर्चित अभिनेत्री सनी लियोनी हिनेही तिच्या खऱ्या नावावर एक फ्लॅट खरेदी केला आहे. म्हणजे रूढ अर्थाने बिग बी आणि सनी लियोनी शेजारी झाले आहेत.

झॅपकी डॉट कॉम मधील माहितीनुसार बिग बी यांनी क्रिस्टल ग्रुपच्या अटलांटिस प्रोजेक्ट मध्ये ५१८४ चौरस फुटांचा डुप्लेक्स फ्लॅट खरेदी केला आहे. हा ग्रुप टिअर टू लेव्हलचा बिल्डर ग्रुप मानला जातो. या घरासाठी बिग बी यांनी ३१ कोटी रुपये मोजले असून ६२ लाख रुपये स्टँप ड्युटी भरली आहे. या २८ मजली इमारती मध्ये २७ व्या मजल्यावर बिग बी यांचे हे नवे घर आहे. या घराला सहा पार्किंग आहेत.

वास्तविक बिग बी यांनी या घराची खरेदी डिसेंबर २०२० मध्येच केली होती पण त्याची नोंदणी एप्रिल २०२१ मध्ये झाली. या काळात करोना मुळे बांधकाम क्षेत्रावर झालेला विपरीत परिणाम थोडा कमी व्हावा आणि ग्राहकांना घर खरेदीला प्रोत्साहन मिळावे म्हणून महाराष्ट्र सरकारने मुद्रांक शुल्कात मोठी सवलत दिली होती. त्याचा फायदा बिग बी यांनाही मिळाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या काळात लग्झरी अपार्टमेंटच्या विक्रीत चांगली वाढ झाली असून अनेक बॉलीवूड कलाकार, उद्योजक, बिझिनेसमन, प्रोफेशनल्सनी घर खरेदी केली आहे. सनी लियोनीने २८ मार्च रोजी १६ कोटी रुपयांना १२ व्या मजल्यावर पाच बेडरूमचा फ्लॅट खरेदी केला आहे.