Home Breaking News अनैतिक संबंधांत पतीचा खून करून घरातच पुरले

अनैतिक संबंधांत पतीचा खून करून घरातच पुरले

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/9789*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

120 views
0

अनैतिक संबंधांत पतीचा खून करून घरातच पुरले

विदर्भ वतन, मुंबई : दहिसर पूर्व परिससरात एक धक्कादायक घटना अघडकीस आली आहे. येथे एका २८ वर्षीय महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा खून करुन घरातील किचनमध्येच त्याला पूरले. हत्येनंतर महिलेने माझा नवरा गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दहिसर पोलिस ठाण्यात दिली होती. मात्र, पोलिसांनी महिलेला चौकशीसाठी बोलावले असता प्रत्येकवेळी महिलेने वेगवेगळ्या प्रकारची उत्तरे दिली. यामुळे पोलिसांना महिलेवर संशय आल्याने आरोपी महिलेला आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या केली, अशी कबुली आरोपी महिलेने पोलिसांना दिली आहे. दरम्यान, आरोपी महिलेचे त्याच्या प्रियकरासोबत गेल्या तीन महिन्यांपासून संबंध होते. त्या प्रेमसंबंधामध्ये पती अडचण निर्माण होत असल्याने पत्नी आणि त्याच्या प्रियकराने त्याचा काटा काढण्याचा प्लॅन तयार केला.