Home Breaking News SSR मृत्यू प्रकरण! एनसीबीकडून मुंबईच्या काही भागात पुन्हा छापेमारी

SSR मृत्यू प्रकरण! एनसीबीकडून मुंबईच्या काही भागात पुन्हा छापेमारी

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/9776*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

90 views
0

SSR मृत्यू प्रकरण! एनसीबीकडून मुंबईच्या काही भागात पुन्हा छापेमारी

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : मुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणात एक महत्त्वाची माहिती समोर आली असून यानुसार, मुंबईतील काही भागात एनसीबीने पुन्हा एकदा छापेमारी केली आहे. NCB ने मंगळवारी रात्री मुंबईतील लोखंडवाला, अंधेरीसह विविध भागात ही छापेमारी केली. NCB ने याप्रकरणी दोन मोठ्या ड्रग्ज पेडलरना अटक देखील केली आहे. हरीश खान आणि त्याचा भाऊ साकिब खान या दोघांना वांद्रे याठिकाणाहून अटक करण्यात आली आहे. सुशांत सिंह ड्रग्ज केसमध्ये ड्रग सप्लाय केल्याचा आरोप या दोघा भावांवर आहे.

काही दिवसांपूर्वी NCB ने सुशांतचा जवळचा मित्र आणि त्याचा सहकारी सिद्धार्थ पिठानी याला अटक केली होती. गेल्यावर्षी सुशांतच्या मृत्यूनंतर सिद्धार्थ पिठानी हे नाव वारंवार समोर आलं होतं. आता पुन्हा एकदा त्याचं नाव चर्चेत आलं आहे.  मिळालेल्या माहितीनुसार एनसीबीने सिद्धार्थला हैदराबाद याठिकाणाहून अटक केली आहे.

सीबीआय आणि एनसीबी या प्रकरणाचा तपास करत आहे. पण, बराच तपास केल्यानंतरही हाती काहीच लागले नाही. अचानक  त्याचा मित्र सिद्धार्थ पिठानी (Siddharth Pithani Arrested)  याला हैदराबादमधून अटक करण्यात आली, त्यामुळे या प्रकरणाची दिशाच बदली आहे. आधी मुंबई पोलिसांनी या घटनेचा तपास केला. त्यानंतर राजकीय धुरळा उडाल्यानंतर हा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. सीबीआयने मुंबईत येऊन नव्याने तपास सुरू केला. आता वर्षभरानंतर सुशांतचा रूममेट सिद्धार्थाला अटक केली आहे.

एका सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केल्यामुळे सिद्धार्थ एनसीबीच्या रडारवर आला होता. सुशांतच्या निधनानंतर त्याने आपले इंस्टाग्राम अकाउंट डिलीट करून टाकले होते. आता अलीकडेच त्याने नवीन अकाऊंट सुरू केले आहे.