बॉलिवूडमधील प्रसिद्ध कला दिग्दर्शक मारुतीराव काळे यांचे कोरोनामुळे निधन

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/9771*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

200

बॉलिवूडमधील प्रसिद्ध कला दिग्दर्शक मारुतीराव काळे यांचे कोरोनामुळे निधन

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : मुंबई- बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कला दिग्दर्शक मारुतीराव काळे यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समोर आले होते. यामुळे त्यांना मुंबईतील एका रुग्णालयात उपचारासाठी भर्ती करण्यात आले होते. पण अखेर त्यांची ही कोरोनाशी सुरु असलेली झुंज अयशस्वी ठरली आणि कोरोनाने त्यांचा वयाच्या 92 व्या वर्षी बळी घेतला. त्यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाचे निदान झाल्यानंतर त्यांना मुंबईतील बांद्रा येथे होली फॅमिली रुग्णालयात भरती करण्यात आले होते. 7 मे 2021 ला त्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर रुग्णालयीन उपचारादरम्यान त्यांची सातत्याने तब्येत खालावत होती. उतार वय असल्याने ते कोरोना विषाणूंवर मात करू शकले नाहीत आणि अखेर गेल्या गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवली. मारुतीराव काळे हे बॉलिवूड जगतातील प्रसिद्ध कला दिग्दर्शकांपैकी एक नाव आहे. मात्र ते मूळ मराठी होते. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील 100 हून अधिक चित्रपटांचे अव्वल व लक्षात राहतील असे सेट तयार केले होते.

मारुतीराव यांनी ’इमान धरम’, ’डिस्को डान्सर’, ’कसम पैदा करनेवाले की’, ’डान्स डान्स’, ’कमांडो’, ’अजूबा’, ’सौदागर’ यांसारख्या सुपरहीट चित्रपटांसाठी कला दिग्दर्शक म्हणून उल्लेखनीय काम केले होते. उत्कृष्ट सेट्स डिझाईन करून प्रेक्षकांसमोर हुबेहूब देखावा तयार करून ठेवणे यात त्यांचा हातखंडा होता आणि त्यांचे काम हीच त्यांची ओळख. त्याआधी त्यांनी सहाय्यक कला दिग्दर्शक म्हणून ’रोटी कपड़ा और मकान’, ’दीवार’,’रझिया सुल्तान’, ’पाकिजा, ’शोर’, ’कभी कभी’, ’दो अंजाने’, ’मेरा साया’, ’यादगार’, ’जांबाज’ अशा लोकप्रिय चित्रपटांसाठी काम केले आहे.
1960 साली आलेल्या आणि अत्यंत गाजलेल्या ’मुघल-ए-आजम’ या चित्रपटासाठी देखील त्यांनी काम केले होते. बॉलिवूडच्या अनेक लोकप्रिय व सुपरहिट चित्रपटांचे कला दिग्दर्शन त्यांनी सहजोगत्या केले होते. ’सौदागर’, ’डिस्को डान्सर’ अशा हिट चित्रपटांचे कला दिग्दर्शन त्यांच्या नावावर आहे. त्यांच काम हे बॉलिवूड इंडस्ट्रीसाठी कायमच अविस्मरणीय ठरणार आहे. त्यांचे निधन हि बॉलिवूड सृष्टीची मोठी हानी आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.