टायगर श्रॉफ आणि दिशा पाटणीविरोधात गुन्हा दाखल

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/9761*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

204

टायगर श्रॉफ आणि दिशा पाटणीविरोधात गुन्हा दाखल

-लॉकडाऊन काळात मुंबईच्या रस्त्यांवर फिरणं पडलं महागात

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : मुंबई – लॉकडाऊन काळात मुंबईच्या रस्त्यांवर फिरल्याप्रकरणी अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री दिशा पाटणीविरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना प्रतिबंधक साथीच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांविरुद्ध भारतीय दंड विधानसभा कलम 188, 34 IPC दिनांक 2.6.2021 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अनेक राज्यात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्ण कमी होत असून अनेक शहर कोरोनामुक्त होताना दिसत आहे. त्यामुळे काही ठिकाणी निर्बंध हटवण्यात आले आहे. याचा फायदा घेऊन काही जण घराबाहेर पडताना दिसत आहे.

नुकतंच बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ, अभिनेत्री दिशा पाटणी आणि त्यांचा ड्रायव्हर या तिघांविरुद्ध वांद्रे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टायगर श्रॉफ आणि दिशा पाटणी हे वांद्र्यात जिमनंतर ड्राईव्हसाठी गेले होते. त्याचवेळी वांद्र्यातील बँडस्टँड पोलिसांनी त्यांना अडवले. त्यानंतर पोलिसांनी त्याचे आधार कार्ड, लायसन्स आणि इतर कागदपत्रांची तपासणी केली. यानंतर त्या तिघांवर गुन्हा नोंदवण्यात आला.