युद्धात कृत्रिम माहिती स्रोतांचा वापर -कर्नल अभय बाळकृष्ण पटवर्धन (निवृत्त) 

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/9756*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

307

 युद्धात कृत्रिम माहिती स्रोतांचा वापर 

  लेखक कर्नल अभय बाळकृष्ण पटवर्धन (निवृत्त) 

 

१० ते २० मे,२०२१पर्यंत झालेल्या इस्रायल पॅलेस्टिन युद्धात कृत्रिम माहिती स्रोतांचा (आर्टफिशियल इंटलजन्स) वापर करण्यात आला. इस्रायल डिफेंस फोर्सेसनी (आयडीएफ) गाझा पट्टीत,पॅलेस्टिनमधील खुंखार आतंकवादी संघटना हमासच्या रॉकेट हल्ल्यांना तोंड देतांना/देण्यासाठी, त्यांनी अंगिकारलेल्या/ त्यांच्यापाशी असलेल्या, कृत्रिम माहिती स्रोत आणि  अत्युच्च संगणकीय तंत्रज्ञानाचा (सुपर कॉम्प्युटिंग टेक्नॉलॉजी) पुरेपूर उपयोग केला.मशीन लर्निंगमधे उच्च दर्जाची काबिलीयत हासील केलेली आयडीएफ,’ऑपरेशन गार्डियन ऑफ द वॉल्स’ नाव असलेल्या या युद्धाला “फर्स्ट आर्टिफिशियल इंटलजन्स वॉर” म्हणते.प्रस्तुत लेखातील युद्ध संबंधित माहिती, इस्रायलच्या ‘जेरुसलेम पोस्ट’ वृत्तपत्रातील वैचारिक उपलब्धीवर आधारित आहे.

हमासला ध्वस्त करण्या मागे,कृत्रिम माहिती स्रोत या युद्धातील प्रमुख शक्तीवर्धक हत्यार (की काँपोनंट अँड पावर मल्टीप्लायर) होत. आयडीएफनी देखील याचा वापर पहिल्यांदाच केला.नवे  सामरिक डावपेच आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील उत्तुंग भरारी याच्या सार्थक सांगडीनी,इस्रायलच्या शास्त्रज्ञ/सेनाधिकाऱ्यांनी नवीन समन्वयी लष्करी धोरणाचा पाया रचून आयडीएफच्या,आर्मी/नेव्ही/ एअरफोर्स या तीनही अंगांना प्रचंड मोठी मारक क्षमता दिली.अकरा दिवसांच्या या युद्धात आयडीएफनी, हमास व पॅलेस्टिन इस्लामिक जिहादी संघटनेच्या गाझा पट्टीतील संसाधन लक्ष्य (इंफ्रास्ट्रक्चरल टार्गेट) आणि नेतृत्वाला अक्षरश: भाजून काढल.मागील काही वर्ष आयडीएफनी नागरी बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या हत्यार,संसाधन आणि संगणकीय ज्ञानभंडारामधूनच कृत्रिम माहिती स्रोताचा पाया  रचला.मागील काही वर्षांच्या सामरिक शांततेच्या पडद्या आड आयडीएफनी, पॅलेस्टिन मधील आतंकवादी संघटना आणि त्यामधील जिहाद्यांसंबंधी माहितीच्या विदा तंत्रज्ञान प्रणालीच एक मध्यवर्ती व्यासपीठ (सेंट्रलाईझ्ड टेक्निकल प्लॅटफॉर्म फॉर जिहादी डेटा) विकसीत करून कार्यरत केल. ही प्रणाली सतत, तिला मिळालेल्या अगदी छोट्यात छोट्या जिहादी माहितीचा साठा,पृथ:करण व मिमांसा करत असते आणि वेळ येताच या संबंधीची माहिती व त्या विरुद्ध शक्य असलेल्या कारवायांचे पर्याय देखील देते.

ही प्रणाली विकसित करण्यात सहभागी असलेल युनिट ८२०० हे प्रख्यात इस्रायली इंन्टलिजन्स युनिट आहे. त्यांनी ही मध्यवर्ती प्रणाली सुचारू रित्या कार्यक्षम करण्यासाठी; ‘अलकेमिस्ट’,’गॉस्पेल’, आणि ‘डेप्थ ऑफ विस्डम’ या सारखे अनेक अल्गोरिदम्स आणि कोड्स विकसित केले ज्याचा वापर या युद्धात करण्यात आला.या कार्यप्रणालीत;सिग्नल इंटलिजन्स,व्हिज्युअल इंटलिजन्स,ह्युमन इंटलिजन्स, जॉग्राफिकल इंटलिजन्स इत्यादींचा वापर झाला आहे.आयडीएफकडे मिळवत असलेल्या अपृथक माहितीचा (रॉ इन्फर्मेशन) खजिना/भांडार आहे.जिहाद्यांविरुद्ध कुठलही सामरिक/डावपेचात्मक पाऊल (स्ट्रॅटेजिक/ टॅक्टिकल स्टेप) उचलण्या आधी या उपलब्ध असलेल्या माहिती भांडारातून त्या संबंधी माहिती बाहेर काढल्यावर त्याच पृथ:करण करून,काय,कशी,कुठे,कधी,किती मोठी आणि कुठल्या शास्त्र/सैनिकांसमेत कारवाई करायची (नेचर,प्लेस,वेपन,स्ट्रेंथ,मोड ऑफ स्ट्राईक) याचे पर्याय ही कार्यप्रणाली देते.

उदाहरणार्थ,इस्रायली मिलिटरी इंटलिजन्स, त्यांच्याकडे असलेल्या/त्यांना मिळालेल्या माहितीमधून, गॉस्पेल या अल्गोरिदमच्या सहाय्यानी मौलिक महत्वाची लक्ष्य (क्वालिटी टार्गेट्स) निवडून त्यांची यादी/ते टार्गेट,इस्रायली एयरफोर्सला देते आणि त्यावर ते आपल “स्ट्राईक प्लॅनिंग” करतात.या प्रणालीतील मध्यवर्ती व्यासपीठामधून,आयडीएफला युद्धात ध्वस्त करण्यासाठी,हमास/ पीआयजेची शेकडो टार्गेट्स मिळालीत.त्यांच्या वायुदल व तोफखान्यानी (एयरफोर्स/आर्टिलरी) शिस्तबद्ध रितींनी त्यांना नष्ट केल.तरी देखील ही प्रणाली सुधारित माहितीच्या आधारे ( अप डेटिंन्ग ऑफ इन्फर्मेशन), दररोज नवीन टार्गेट्स देत असल्यामुळे हमास/पीआयजेच्या जिहाद्यांना, पळता भुई थोडी झाली. मागील दोन वर्ष आयडीएफनी;गाझा पट्टीतील हजारो किनारी व  मध्यवर्ती नागरी ठिकाणांमधील (डेन्सली पॉप्युलेटेड कोस्टल/सिव्हिल एरिया) जिहादी ठिकाणांना (हायडींग प्लेसेस) याच माध्यमातून शोधून निश्चित केल होत.

इस्रायली तोफा/विमानांच्या अचूक माऱ्यामुळे,जेरुसलेम/तेल अविव्हवर रॉकेट बरसवणारे   जिहादी,जसजसे स्वतः व  लॉन्चर्सच्या जागा बदलत होते तसतस इस्रायली रियल टाईम इंटेलिजन्स, त्यांचा पाठपुरावा करत, आयडीएफला त्वरित ही बदलती माहिती देत/पुरवत होत. कृत्रिम माहिती स्रोतांमुळे युद्ध कमी वेळात संपवता आल कारण,अत्युच्च शोध प्रक्रियेमुळे (ड्यू टू सुपर रिकग्निशन) जिहाद्यांच्या नवीन ठिकाणांवर हल्ले करण सुलभ सोप झाल अस आयडीएफच मत आहे.आयडीएफनी; हमास/पीआयजेची ठिकाण,रॉकेट लॉन्चर,रॉकेट मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स, प्रॉडक्शन/स्टोअरेज साईट्स, मिलिटरी इंन्टलिजन्स ऑफिसेस,ड्रोन्स,कमांडर्स रेसिडेन्सस आई हमास नेव्हल कमांडो युनिटची संसाधन,हत्यार,३० किलो स्फोटक नेणाऱ्या जीपीएस गायडेड सबमरीन्सना लक्ष्य बनवून त्यांचा शिस्तबद्ध नाश केला.

आयडीएफ युनिट ९९००चे उपग्रह (इन्फर्मेशन सॅटेलाईट्स) अनेक वर्षांपासून, जॉग्रफिकल इंटलिजन्स गोळा करताहेत. युद्ध सुरु व्हायच्या आधी पासून व ते सुरू असतांना देखील, या उपग्रहांच्या माध्यमातून बदलत्या जमिनी बनावटीची क्षणोक्षणीची माहिती (रियल टाईम इंन्टलिजन्स ऑफ टेरेन चेंजेस),आयडीएएफला मिळत होती.त्यामुळे,लॉन्चर्सनी बदललेल्या ठिकाणांमधून गोळे डागल्यावर त्यांना लगेच लक्ष्य करण आयडीएफला शक्य झाल.उपग्रह फोटोंमधील बदलाचा अभ्यास करून आयडीएफनी,१४ रॉकेटलॉन्चर युनिट्सना बरबाद केल.यांच्याच आधाराने आयडीएफनी, हमास/ पीआयजेच्या  नागरी क्षेत्रात लपलेल्या १७०वर वरिष्ठ नेत्यांना,नागरी क्षेत्राचा फार  मोठा अनुषंगिक/ अप्रत्यक्ष  विध्वंस न होता (कोलॅटरल डॅमेज),ठार केल.यात हमासचे  ४० क्षेपणास्त्र संशोधक/शास्त्रज्ञ होते. एक दवाखाना व सहा शाळांनी घेरलेल्या उंच इमारती खालील  भू सुरुंगात लपलेल्या (टनेल अंडर हाय राईझ बिल्डिंग), हमासच्या ब्रिगेडियर बसेम इझाक, या गाझा सिटी कमांडरला,इस्रायलच्या विमानातील क्षेपणास्त्रांनी,कुठल्याही प्रकारची नागरी क्षती न होता,अलगद टिपल.त्याच्या बरोबर,हमास सायबर व मिसाईल टेक्नॉलॉजी चीफ जोम्मा तहला,मिसाईल प्रॉजेक्ट हेड जेमाल झेबदा आणि हत्यार बनवणारे१३ इतर शास्त्रज्ञही  मारल्या गेलेत. याच इमारतीत असलेल अल जझिरा या वृत्तपत्र/ चलचित्र वाहिनीच कार्यालयही या हल्ल्यात नष्ट झाल.हवाई हल्ल्या आधी ही इमारत रिकामी करण्यासाठी इस्रायलनी केवळ एक तासाची मुदत दिली होती. तीन विंग्ज असलेली  ही इमारत कशी नष्ट झाली याचा थरारक/रोमांचक व्हिडियो बहुदा सर्वांनीच इंटरनेटवर पाहिला असेल.

अकरा दिवस सतत चाललेल्या हवाई हल्ल्यांमुळे हमास/पीआयजेच गाझा पट्टीतील जमिनीखालील सुरुंग प्रणाली (मेट्रो टनेल नेटवर्क) पार कोलमडली.इस्रायली सेनाधिकाऱ्यांनुसार,नागरी  वस्तीतील घरांच्या खालून गेलेल्या शेकडो किलोमीटर लांबीच्या या भूसुरुंगांची (टनेल्स) इत्थंभूत व अद्ययावत माहिती त्यांना जॉग्रफिकल इंटलिजन्सच्या माध्यमातून  मिळत होती.त्यामुळे जिहादी नेतृत्व आणि हत्यार या टनेलमधे जसजस मागेपुढे होत/जात होत तसतसे इस्रायली तोफा/हवाई हल्ल्यांचे रुख बदलत होते. इस्रायली मिलिटरीनी या अंडर ग्राउंड टनेल नेटवर्कची खात्री(कन्फर्मेशन)आर्टिफिशियल इंटलिजन्सद्वारे केली होती.तंत्रज्ञानातील माहिरियत (टेक्निकल सुपिरियॉरिटी) आणि सर्व प्रकारच्या सामरिक विदेला एकत्र गुंफण्याची काबिलीयत (बिग डेटा फ्युझिंग इंटलिजन्स कॅपेबिलिटी) यामुळे हे शक्य झाल. त्यांच्या ऑपरेशन्स रुममधे या अंडर ग्राउंड टनेल नेटवर्कचा नकाशा खात्रीपूर्ण रित्या आखला गेल्यावर इस्रायली मिलिटरी, त्याची  जमिनीवरची आणि खालची रूपरेखा (एक्स्टर्नल/इंटर्नल ले आउट), आकार (डेप्थ अँड साईझ),त्यांच्या आवरणाची जाडी (थिकनेस ऑफ ऑलराउंड रुफिंग) व त्याची वहन क्षमता (नेचर ऑफ रूट्स) यांची,हवाई/जमिनी हल्ल्यांच्या दृष्टिकोनातून आवश्यक असलेली अद्ययाववत माहिती सतत गोळा करत होती. या नेटवर्कवरील अटॅक प्लॅन निश्चित करण्यासाठी त्यांनी ही माहिती, इस्रायली वायुदलाला दिली.

इस्रायली एयरफोर्सनी ७००च्या वर विमान हल्ले केले तरी देखील,जिहादी अंडर ग्राउंड टनेल नेटवर्क  संपूर्णपणे नष्ट होऊ शकल/ झाल नाही हे,आयडीएफचे अधिकारी प्रांजळपणे मान्य करतात. पण याच बरोबर;जरी ते पूर्ण नष्ट झाल/होऊ शकल नाही तरी जिहादी देखील त्याचा पुनर्वापर करू शकणार नाही,ते अशक्य आहे;याची ग्वाही देखील ते देतात.एका विमानात आठ रॉकेट्स/क्षेपणास्त्र असतात हे गृहीत धरल्यास,आयएएफनी किमान ५६०० रॉकेट्स/क्षेपणास्त्र अचूक डागून जिहादी सामरिक धोरणाचा (कॉम्बॅट स्ट्रॅटेजी) पायाच खचवला/नष्ट केला असं म्हटल्यास ते वावग होणार नाही. वर्षानुवर्षे मेहनत करून गोळा केलेली माहिती (इयर्स ऑफ इंटलिजन्स गॅदरिंग),अकल्पित आक्रमण प्रणालीचा विचार (आउट ऑफ बॉक्स थिंकिंग) आणि प्रत्येक इंटलिजन्स एजन्सीच्या माहितीच एकत्रित पृथ:करण (फ्युजन ऑफ इंटलिजन्स पावर) यांच्या प्रभावी सांगडीला जमिनीवर प्रत्यक्ष लढणाऱ्यांच्या हवाली केल्यामुळे हे नेटवर्क लीलया नष्ट झाल/होऊ शकल.या एकत्र विदेच हवाई हल्ल्यांच्या दृष्टिकोनातून पृथ:करण करून इस्रायली वायुदलानी,टनेल/अपार्टमेंट/बिल्डिंगला नष्ट करायला कोणत्या प्रकारची रॉकेट्स/मिसाईल्स वापरली पाहिजे हे सुनिश्चित केल.

युनिट ८२००नी विकसीत केलेल्या,अलकेमिस्ट अल्गोरिदम या आर्टिफिशीयल इंटलिजन्स प्रणाली आणि मशीन लर्निंगच्या सुयोग्य वापराद्वारे आयडीएफ, इस्रायली ठिकाणांवर होऊ घातलेल्या/ होणाऱ्या, हमास/ पीआयजेच्या रॉकेट/मिसाईल हल्ल्यांची पूर्वसूचना इस्रायली मिलिटरी/वायुदलाला देत असे. त्यांच्या संगणकीय पाटीवर (युझर फ्रेंडली टॅबलेट) असलेल्या या प्रभावी अल्गोरिदमचा वापर सर्वस्तरीय कमांडर्सनी केल्यामुळे,सार्जंट ओमेर तबीब हा एकच  सैनिक सोडता इतर कोणीही सैनिक,हमास/ पीआयजेच्या ३६००वर रॉकेट/मिसाईल्सना बळी पडल नाही.इस्रायली मिलिटरी/एयरफोर्सनी याच अल्गोरिदमच्या सहाय्याने,मिळालेल्या लक्ष्यावर अतिशय अचूक मारा (प्रिसिजन स्ट्राईक) करत इतर नागरिकांच अत्यल्प अनुषंगीक नुकसान होईल याची काळजी घेतली.हमासनुसार इस्रायल हल्ल्यात,६६ बालक/स्त्रीयांसमेत २६३ पॅलेस्टिनियन मारले गेले असून १९७० जखमी झाले आहेत.आयडीएफनुसार, १८० जिहादी मारल्या गेले असून काही नागरिक,फायरिंग करतांना हमासच्या रॉकेट्स/मिसाईल्सचा स्फोट झाल्यामुळे/टनेल अंडरग्राउंड नेटवर्कवरील इस्रायली हवाई हल्ल्यांदरम्यान ध्वस्त झालेल्या इमारतींखाली दबून ठार झाले असल्याची शक्यता नाकारता येत नाही.संयुक्त राष्ट्रसंघाच्या पॅलेस्टिन रिफ्युजी एजन्सीचे चीफ,मॅथिस शॅमले म्हणतात “व्हिशिअसनेस अँड फेरॉसिटी  ऑफ इस्रायली स्ट्राईक वॉज हेविली फेल्ट. इम्प्रेशन इज दॅट,देअर ईज ह्यूज सॉफिस्टिकेशन इन द वे इस्रायली मिलिटरी स्ट्रक”.आणि,इस्रायल पॅलेस्टिन युद्धामधे इस्रायलनी कृत्रिम माहिती स्रोतांचा (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) वापर केल्याचा याहून मोठा पुरावा मिळणार नाही.

चीन आणि पाकिस्तानशी युद्धासाठी सज्ज होत असलेल्या भारताने या पासून शिकण्यासारख खूप काही आहे. एक) आपल इंटलिजन्स गॅदरिंग,कोलेशन,अनालिसिस आणि डेसिमीनेशन प्रणालीची बांधणी/उभारणी याच धर्तीवर होणं आवश्यक आहे; दोन) आपल्या संगणकतज्ञ व  शास्त्रज्ञांनी या पद्धतीच्या अल्गोरिदम इक्वेशन्सची निर्मिती केली पाहजे; तीन) पाकिस्तान प्रेणीत जिहादी नेटवर्क आणि चीन प्रेणीत नक्सली नेटवर्क व यांच्या नेत्याची विस्तृत  माहिती पुस्तक (डिटेल्ड डोझीयर्स)  तयार करण सुरु केल पाहिजे.सांप्रत हे होत नसल्यामुळे गन्हेगारांचं ट्रॅकिंग करायला किती अडचणी येतात हे,र्कारी यंत्रणांच्या हातावर तुरी देऊन,आर्थिक गुन्हेगार मेहुल चोकसी जसा फरार/नजरे आड झाला त्या वरून उजागर होत; चार) अंतरिक्षाच्या पाकिस्तान/चीनवरील जिओस्टॅटिकल परिघात माहिती गोळा करणारे उपग्रह (इंन्टलिजन्स गॅदरिंग सॅटेलाईट्स) पाठवून/स्थापन करून त्यांच्या माध्यमातून सीमेवर/सीमापार होणाऱ्या संसाधनीय उपक्रमांची माहिती सतत गोळा करत,त्याच पृथ:करण व वितरण करणाऱ्या जिओ इंटलिजन्स बँकची तुरंत स्थापना करण ही काळाची गरज आहे. कारगिल युद्ध/ डोकलाम तिढा व लडाख चकमकीमधे तेथील सामजिक व  भौगोलिक बदलाची (स्ट्रॅटेजिक अँड जॉग्रफिकल चेंजेस) माहिती नसल्यामुळे सुरवातीला कशी भंबेरी उडाली होती हे लक्षात घेतल तर  याची आवश्यकता लक्षात येते; पाच) कृत्रिम माहिती स्रोत आणि अत्युच्च संगणकीय तंत्रज्ञानाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी देशात संसाधन/तंत्रज्ञांच जाळ उभारण अत्यावश्यक आहे. त्यासाठी;आपल्या येथून होणार ब्रेन ड्रेन थांबवण, शैक्षणिक/वैचारिक/बौद्धिक योग्यतेनुसार माणसांची निवड (रिक्रुटमेंट) करण आणि त्यांना त्या प्रमाणे वेतन व सर्वंकष सुविधा पुरवण्याला प्राथमिकता दिली पाहिजे; सहा) संरक्षण दलांच्या अत्याधुनिक हत्यारांच्या गरजा,सत्वर पूर्ण केल्या जाण अत्यावश्यक आहे. देशाची आर्थिक स्थिती लक्षात घेता ते कधी शक्य होईल याची आजमितीला कल्पनाही करता येत नाही. सैनिक/वैमानिक/टॅंक क्र्यू यांना हवी ती शस्त्रास्त्र देऊन त्यांच्या अत्याधुनिक युद्ध प्रशिक्षणाची सोय करण हे संरक्षण मंत्रालयाच प्रथम कर्तव्य आहे.दुर्दैवाने हे होतांना दिसत नाही.आजही फायर करताना तोफ फुटल्यामुळे सैनिक, जुन्या विमानांला अपघात झाल्यामुळे वैमानिक आणि सिस्टीम माल फ़ंक्शनिंगमुळे नौसैनिकांना प्राण गमवावे लागताहेत; सात) इंटलिजन्स युनिफिकेशन, डिटेल अनालिसिस आणि क्विक डेसिमीनेशन ऑफ इन्फर्मेशनशिवाय युद्धात कृत्रिम माहिती स्रोतांचा वापर करण शक्य नाही. सध्या सर्व इंटलिजन्स एजन्सी,राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराखाली कार्यरत व त्यांनाच जबाबदार आहेत.वन अप मनशीप/स्वयंभू साम्राज्य बांधणीची  आसक्ती आणि कुठल्याही प्रकारच्या बदलाला विरोध करण्याची भारतीय मानसिकता  लक्षात घेता हे किती लवकर साध्य होईल हे सांगता येत नाही; आठ) आयडीएफ अंतर्गत इस्रायली आर्मी/नेव्ही/ एयरफोर्स एकत्र काम करतात.आपल्याकडे अजूनपर्यंत तरी हे शक्य दिसत नाही.याची चुणूक १९९९ मधील कारगिल युद्धाच्या वेळी दिसल्यामुळे,भारतीय त्रिदलाच्या एकीकरणासाठी २०२०मधे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफची नियुक्ती करण्यात आली.पण परिस्थिती मात्र आजही ‘जैसे थे वैसे ही है’; नऊ) चीननी  आर्टिफिशियल इंटलिजन्स क्षेत्रात जबरदस्त मुसंडी मारली आहे. पाकिस्तान देखील त्या दिशेने वळवळ करत असतांना भारताने मागे राहून चालणार नाही. कृत्रिम माहिती स्रोतांच्या अंगिकाराला सर्वोच्च प्राथमिकता ही आजमितीला आपली अपरिहार्यता आहे; आणि दहा) कुठल्याही परिस्थितीशी लढा देतांना जीव तोडून प्रयत्न करावे लागतात. युद्धजन्य परिस्थितीत हे सर्वात जास्त महत्वाच/लागू  असत. त्यासाठी,देशांर्गत उजागर होणाऱ्या मानवाधिकारी,तथाकथित विचारवंत आणि अकारण/वैकल्पिक राजकीय विरोधाला बाजूला सारून कारवाई करण अपेक्षित असत. त्यासाठी, प्रसंगी काही हाल अपेष्टा सोसूनही,युद्धात लागणारी संसाधन उभारणी करण अत्यावश्यक असत हे ज्यावेळी सरकार,प्रशासन, राजकीय नेते/पक्ष आणि जनतेच्या पचनी पडेल तो भारतासाठी सुदिन असेल.

 

 

०२/६/२१ : १६,भगवाघर कॉलनी,धरमपेठ,नागपूर,१०  :  ९४२२१४९८७६/ abmup५४@gmail.com.