संकटकाळात गरजुंना धान्य मिळावे, शिवसेनेतर्फे अन्नधान्य पुरवठा वितरण अधिका-यांना निवेदन

183

विदर्भ वतन न्युज पोर्टल, नागपूर – संपर्क प्रमुख आ़ दुष्यंत चतुर्वेदी व महानगर प्रमुख प्रमोद मानमोडे यांच्या मार्गदर्शनात शहर प्रमुख नितीन तिवारी दिपक कापसे यांच्या नेतृत्वात शहर सचिव मुन्ना तिवारी,विभाग प्रमुख विशाल कोरके, उपशहर प्रमुख मुकेश रेवतकर, यांच्या सहकार्याने शहर अन्नधान्य पुरवठा वितरण अधिकारी अनिल सवई यांना २,६७,८५४ राशन कार्ड धारकांना धान्य मिळत नसुन याप्रकरणी या कोरोना संकटकाळात राशन कार्ड धारकांना नियमित धान्य मिळावे याबाबत निवेदन सादर करण्यात आले. याप्रसंगी धान्य वितरण अधिकारी अनिल सवई यांनी आश्वासन दिले़ त्यांनी सांगितले की, संपूर्ण झोनचा आढावा घेऊन शासनाची परवानगी घेऊन प्रत्येक राशन कार्डला प्राधान्य मंजूर करण्यात येईल व लवकरात लवकर मागील एक वर्षांपासून नवीन बनलेले राशन कार्ड व सिस्टीमव्दारे बंद असलेले राशन कार्ड यांना प्राधान्य मान्यता देण्यात येईल़ तसेच धान्य नियमित स्वस्त धान्य दुकानातून मिळतील अशीही हमी दिली़ यावेळी शहर प्रमुख नितीन तिवारी, दिपक कापसे, शहर सचिव मुन्ना तिवारी, विभाग प्रमुख विशाल कोरके, सुमित वानखेडे प्रामुख्याने उपस्थित होते़