Home इतर पीक कजार्साठी बँकेने शेतक-यांना त्रास देणे बंद करा – आम आदमी पार्टीची...

पीक कजार्साठी बँकेने शेतक-यांना त्रास देणे बंद करा – आम आदमी पार्टीची मागणी

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/9742*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

60 views
0

पीक कजार्साठी बँकेने शेतक-यांना त्रास देणे बंद करा
– आम आदमी पार्टीची मागणी

विदर्भ वतन, चंद्रपूर : जिवती तालुक्यातील कुंभेझरी तथा लांबोरी येथील शेतकरी यांनी आपचे जिल्हाध्यक्ष सुनील देवराव मुसळे यांच्या नेतृत्वात माननीय जिल्हाधिकारी यांची भेट घेतली. जिवती तालुक्यात पाटण येथे सध्या स्टेट बँक ही एकच राष्ट्रीयकृत बँक आहे.
या बँकेमध्ये तालुक्यातील अनेक शेतक-यांचे खाते आहे. या बॅकेबद्दल अनेक शेतक-यांच्या तक्रारी आहेत. एकीकडे कोरोनामुळे सामान्य जनतेचे जीवन जगणे कठीन झाले आहे वारंवार वाढत असलेले जीवनावश्यक वस्तूचे भाव तथा शेती अवजाराचे भाव,बियाणे, खताच्या किमती गगनाला भिडल्या आहे. या परिस्थितीत जिवती तालुक्यातील स्टेट बँक शेतक-यांना पीक कजार्साठी त्रास देत आहे. कुंभेझरी व लांबोरी येथील शेतक-यांनी सन 2018/ 19 शेतीवरील पीक कर्ज घेतले .महाराष्ट्र शासनाच्या कर्जमाफी योजनेमध्ये पिक कर्ज माफ झाले. पुन्हा बँकेकडे कर्ज मागणी करिता अर्ज सादर केले असता आपले गाव सर्विस एरियामध्ये येत नाही असे सांगून शेतक-यांची बोळवण करीत आहे. शेतक-याना व पिक कर्ज देण्यापासून त्यांना वंचित ठेवलेले आहे. शेतकरी दुस?्या बँकेमध्ये पिक कर्ज मागण्या करता गेले असता त्या ठिकाणाहून सुद्धा आपण या अगोदर ज्या बँकेमधून कर्ज घेतले त्याच बँकेमध्ये कजार्साठी अर्ज करावे असे सांगितले जात आहे सध्या शेतीचा हंगाम सुरू झाला असल्यामुळे शेतक-यांना बँकेकडून कर्ज मिळाले नाही तर बी बियाणे, खते, औषधी, कसे घ्यायची असा प्रश्न निर्माण झाला आहे .सदर बँकेने पीक कजार्पासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केल्यास शेतक-याला आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय ऊरणार नाही.
जिल्हाधिकारी याना निवेदन देताना आम आदमी पाटीर्चे जिल्हाध्यक्ष सुनील देवराव मुसळे जिवती तालुका अध्यक्ष श्री मारुती पुरी , शेतकरी मुकींद शंकर राठोड ,नागनाथ यादवराव ठोंबरे, गणेश बालाजी गिरी, संग्राम कोडींबा ठोंबरे ,बळीराम नामदेव ठोंबरे , सुपारी रामू मडावी ,वामन आत्राम भिमु पोतु कुमरे, भिमु कर्णु कोडापे ,मारोती कोडापे तथा इतर अनेक कुंभेझरी व लांबोरी येथील शेतकरी उपस्थित होते.