शिकवणीच्या नावावर दिले प्रेमशास्त्राचे धडे 11 वीच्या विद्यार्थ्यासोबत मॅडम पळून गेल्या कुणीकडे

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/9732*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

260

शिकवणीच्या नावावर दिले प्रेमशास्त्राचे धडे
11 वीच्या विद्यार्थ्यासोबत मॅडम पळून गेल्या कुणीकडे

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, वृत्तसंस्था/पानीपत- हरियाणाच्या पानीपत शहरातून शिक्षक-विद्यार्थ्यांच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. एका खासगी शाळेची शिक्षिका १७ वर्षाच्या विद्यार्थ्यासह पळून गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. पानीपतच्या देशराज कॉलनीतील एका खासगी शाळेत शिकवणारी ही शिक्षिका घटस्फोटित असून ती आपल्या माहेरी राहत होती. याप्रकरणी विद्यार्थ्याच्या वडिलांनी जिल्हा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
वडिलांनी तक्रारीत म्हटल्याप्रमाणे त्यांचा मुलगा नेहमीप्रमाणे २९ मे रोजी दुपारी दोन वाजता शिक्षिकेच्या घरी शिकवणीसाठी गेला होता. परंतु त्यानंतर तो परत आला नाही. शिक्षिकेच्या कुटुंबाने प्रथम याबाबत वक्तव्य करण्याचे टाळले. त्यानंतर त्यांनी मुलीच्या बेपत्ता होण्याविषयी माहिती दिली. याप्रकरणी पोलिसांनी शिक्षिकेविरूद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस शिक्षिका आणि विद्यार्थ्याचा शोध घेत आहेत, परंतु अद्यापपयर्ंत या दोघांचा कुठेही शोध लागला नाही. ते गायब झाल्यापासून त्यांचे दोन्ही मोबाइल फोन बंद आहेत. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत विद्यार्थ्याच्या वडिलांनी सांगितले आहे की, त्यांचा मुलगा ११ व्या वर्गात असून पळून गेलेली महिला त्याची वर्गशिक्षिका आहे.
गेल्या दोन वर्षांपासून हा अल्पवयीन विद्यार्थी शिक्षिकेच्या घरी शिकवणीसाठी जात असे. लॉकडाउनमुळे शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थी दररोज चार-चार तासांच्या शिकवणीसाठी शिक्षिकेच्या घरी जात असे. २९ मे रोजी दोघेही अचानक गायब झाले. विशेष म्हणजे दोघांनीही घरातून कोणत्याही वस्तू नेल्या नाहीत. मौल्यवान वस्तूंपैकी शिक्षिकेच्या हातात फक्त सोन्याची अंगठी आहे.