Home Breaking News सीबीएसई बारावीची परीक्षा रद्द

सीबीएसई बारावीची परीक्षा रद्द

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/9715*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

114 views
0

सीबीएसई बारावीची परीक्षा रद्द

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, वृत्तसंस्था/नवी दिल्ली-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात मंगळवारी घेतलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशात निर्माण झालेल्या कोरोनाच्या परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा देखील कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रद्द करण्याची मागणी केली जात होती. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या काळामध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भीती देखील वर्तवली जात होती. या पार्श्‍वभूमीवर अखेर पंतप्रधानांनी घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, परीक्षा होणार नसल्यामुळे आता १२वीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचा प्रश्न निर्माण होणार असून त्यासंदर्भात सीबीएसई निश्‍चित अशा मानकांच्या आधारे नियोजित वेळ ठरवून त्यानुसार मूल्यमापन करून निकाल जाहीर करेल, असे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य
विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि त्यांची सुरक्षा याला सर्वाधिक प्राधान्य असेल. त्याविषयी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये परीक्षेसंदर्भात निर्माण झालेला तणाव संपुष्टात यायला हवा. अशा प्रकारच्या तणावपूर्ण वातावरणात विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची सक्ती केली जाऊ नये, असं पंतप्रधानांनी हा निर्णय घेताना म्हटले आहे.