Home Breaking News केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमीत्त दक्षिण नागपूर भाजयुमोतर्फे रक्तदान शिबीराचे आयोजन

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमीत्त दक्षिण नागपूर भाजयुमोतर्फे रक्तदान शिबीराचे आयोजन

69 views
0

विदर्भ वतन न्युज पोर्टल, नागपूर – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमीत्त दक्षिण नागपूर भाजयुमोतर्फे ठिकठिकाणी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते़ जुने ज्ञानेश्वर नगर येथील हनुमान मंदिर परिसरात पार पडलेल्या रक्तदान शिबीराला मोठ्या प्रमाणात युवक व नागरिकांनी प्रतिसाद दिला़ दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते, भाजप नागपूर शहर अध्यक्ष तसेच विधानपरिषद आमदार प्रविण दटके, नगरसेवक अभय गोटेकर, नगरसेविका भारती बुंडे, कल्पना कुंभलकर यांच्यासह दक्षिण नागपूर भाजयुमो अध्यक्ष अमर धरमारे यावेळी उपस्थित होते़ सकाळी ९ ते १ वाजेपर्यंतच्या सत्रात आयोजित करण्यात आलेल्या या शिबीरामध्ये युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता़ कोविड काळातही रक्तदान शिबीरात प्राप्त झालेल्या उत्तम प्रतिसादाचे सर्वांनी कौतूक केले तसेच दक्षिण नागपूर भाजयुमो अध्यक्ष अमर धरमारे यांच्या आयोजनाची स्तुती केली़ रक्तदान करणाºयांचा यावेळी प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला़ कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी केतन साठवणे, मोहन टोंग, नितीन कठाणे, सुरज मते, नितीन लांजेवार, सुरेश लांजेवार, अतुल बिवडे, रोशन आवारे, देवेंद्र ठेपे, राजेश वासनिक,दिनेश गुरपुडे, राम गौळकर यांच्यासह अनेकांनी सहकार्य केले़