कोरोनाने दगावलेल्या कर्त्या व्यक्तीच्या परिवारासाठी पालकत्व मोहीम राज्यभर राबविण्यात यावी- आमदार राजू पारवे

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/9696*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

183

कोरोनाने दगावलेल्या कर्त्या व्यक्तीच्या परिवारासाठी पालकत्व मोहीम राज्यभर राबविण्यात यावी- आमदार राजू पारवे

विदर्भ वतन, नागपूर : कोरोना मुळे घरातील दगावलेल्या कर्त्या व्यक्तीच्या निधनानंतर निराधार झालेल्या परिवारासाठी पालकत्व मोहीम राज्यभर राबविण्यात यावी अशी मागणी आमदार राजू पारवे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली. राज्यात कोरोनाच्या दुस-या लाटेत मोठ्या संख्येत तरुण वयोगटातील घरातील कर्त्या असलेल्या व्यक्तींचा कोरोनाने बळी घेतलेला आहे. त्यामुळे निराधार आणि अनाथ झालेल्या मृतकाच्या परिवाराला आर्थिक मदतीची नितांत गरज आहे. याकरिता राज्यभर कोरोनाने दगावलेल्या कर्त्या व्यक्तीच्या परिवारासाठी पालकत्व मोहीम राज्यभर राबविण्यात यावी अशी मागण आमदार राजू पारवे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे. आमरार पारवे यांनी पीडित परिवारांची भेंट करून त्यांना आवश्यक सामग्री व आर्थिक मदत देऊन सांत्वन करण्यात आले आहे.