क्षमतेच्या 50 % किंवा जास्तीत जास्त 200 व्यक्तिंची, वेळेचे बंधन न लावता परवानगी द्यावी.

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/9690*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

250

क्षमतेच्या 50 % किंवा जास्तीत जास्त 200 व्यक्तिंची, वेळेचे बंधन न लावता परवानगी द्यावी.

– नागपुर मंगल कार्यालय अँड लॉन असोसिएशन द्वारे अभिजितदादा वंजारी यांच्या मार्गदर्शनात मा. नितिनजी राऊत पालकमंत्री यांना दिले निवेदन

विदर्भ वतन, नागपूर : गेल्यावर्षी मार्च 2020 मध्ये कोरोनाने शिरकाव केला व देशव्यापी लॉकडाऊन लावल्यामुळे आमचा व आमच्याशी निगडीत सर्व संबधित व्यावसायिकांचा पूर्ण सीझन सम्पला. मधल्या काळात 50 व्यक्तीची परवानगी देण्यात आली पण 22 फेब्रुवारी 2021 पासून पुन्हा पालकमंत्र्यांच्या आदेशाने बंद लॉन- मंगलकार्यालय बंद करावे लागले व परत एकदा आमचा व्यवसाय संपुष्टात आला. तरीही आम्ही प्रतिष्ठाने बंद करून शासनाला मदत केली.आता प्रशासनाने अम्हाला 25 व्यक्ती व 2 तास वेळ अशी परवानगी काही अटी व शर्ती लावून दिली.
दिलेल्या वेळेमध्ये कार्यक्रम करणे परवडणारे नाही. वाढती महंगाई व इतर खर्च लक्षात घेता 1 जून पासून आम्हाला क्षमतेच्या 50 % किंवा जास्तीत जास्त 200 व्यक्तिंची, वेळेचे बंधन न लावता परवानगी द्यावी. गेल्या वर्षभराचे नुकसान पाहता 20-21 व 21-22 मधिल लोन ह्फ्ते शिथिल करण्यात यावे. प्रॉपर्टी टैक्स, ईलेक्ट्रिक बिलांमधे सूट देण्यात यावी.तसेच आमच्या सोबत या व्यवसायाशी संलग्न डेकोरेशन, केटरिंग, घोडा, बग्गी, लाईट, पार्लर, इवेंट मनेजमेंट इत्यादि सर्व व्यवसायिकांना मदत करावी व रोजगाराचा मार्ग सुकर करावा. त्या वेळेस उपस्तिथ संजय काळे, विजय तलमले, आशिष देशमुख व असोसिएशन पदाधिकारी होते.