महाज्योती मंडळ अंतर्गत स्पर्धा परीक्षेसाठी असणा-या योजनाची अंमलबजवानी करावी – आप

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/9684*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

128

महाज्योती मंडळ अंतर्गत स्पर्धा परीक्षेसाठी असणा-या योजनाची अंमलबजवानी करावी – आप

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर : ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांनसाठी स्थापन कालेल्या महाज्योती मंडाळ हे सामाजिक न्याया करीत स्थापित केले गेले आहे. आम आदमी पार्टी ने बहुजन समाजाला न्याय मिळून देण्याकरीता खालील मागण्या सरकारकड़े केल्या आहेत.
2020 परीक्षेतून मुलाखतीस निवड झालेल्या विद्यार्थ्यांना महाज्योती अंतर्गत मंजूर 25,000 रुपये शिष्यवृत्ती,सर्व मुलाखतीस पात्र उमेदवारांचे फॉर्म भरून घेण्यात येऊन देखील शिष्यवृत्ती मिळालेली नाही,
महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था, महाज्योती,नागपुर या संस्थेचे अतिरिक्त कार्यभार असलेले व्यवस्थापकीय संचालक प्रदिप डांगे, यांचेकडून अतिरिक्त कार्यभार काढुन तेथे स्थानिक नागपूर येथीलच पूर्ण वेळ व्यवस्थापकीय संचालकांची नेमणूक करण्याबाबत विनंती!
महाराष्ट्र शासनाने बार्टी आणि सारथीच्या धर्तीवरच महाज्योतीची ओबीसी विद्यार्थी व समाजासाठी निर्मिती केली. पण त्यावर व्यवस्थापकीय संचालक म्हणून, नागपूरपासून १८० कि.मि. वरील नक्षलग्रस्त गोंदिया जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिप डांगे यांचेकडे अतिरिक्त कार्यभार दिला.
याचा परिणाम असा झाला की, प्रदिप डांगे यांचेकडे गोंदियालाच महत्वाचे पद असल्यामुळे ते १८० कि.मि. दुरवरून,नागपुरला महाज्योतीच्या कामकाजात लक्ष देवु शकले नाही! महिनोंगणती ते कार्यालयात येत नाहीत. गेल्या सहा महिण्यापासुन महाज्योतीच्या संचालक मंडळाची मिटींगही बोलावलेली नाही!ओबीसी विद्यार्थ्यांच्या योजनांची अंमलबजावणी झालेली नाही!
हे निवेदना देत अस्तान युवा राज्य समिति सदस्य कृतल वेलेकर, युवा विधर्भ संयोजक पीयूष आकरे, नागपुर सचिव भूषण ढाकूलकर, नागपुर सहसंयोजक राकेश उराडे, अन्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्तित होते.