
शिवसेनेचे वरिष्ठ नेते प्रकाशजी जाधव यांची खैरी गावाला अचानक भेट!
-खैरी गावातील विकासा-कामाविषयी घेतली संपूर्ण माहिती
विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर : विशेषता कोरोना संबंधित जनजागृती तसेच खैरी हे गाव कोरोनामुक्त होऊन 90% लसीकरण झाले. याची इत्यंभूत माहिती प्रकाश जाधव यांना देण्यात आली. त्यांनी सरपंच व त्याचा टीमचे विशेष कौतुक करून खैरी-वारेगाव पांधनची पाहणी केली पाहणी दरम्यान
त्यांच्या निदर्शनास असे आले की, या पांदन वरील राखडीच्या डॅम मुळे
खैरी, वारेगाव, बिना इत्यादी तसेच इतर गावांमध्ये प्रदूषण मोठ्या प्रमाणात होऊन लोकांच्या जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे?
एका दिवसामध्ये राखेने भरलेले हजारो ट्रकची वाहतूक या पांधन रस्त्याने होत असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे
या सर्व गोष्टीवर आवाज उठविण्याची ग्वाही देऊन वेळ पडल्यास आंदोलन करू याची हमी त्यांनी दिली. दरम्यान खैरी ग्रामपंचायत तर्फे त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले..प्रसंगी ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य गण तसेच खैरी येथील आरोग्य उपकेंद्रचे कर्मचारी
उपस्थित होते.

