टार्झनची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचा विमान अपघातात मृत्यू

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/9650*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

133

टार्झनची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचा विमान अपघातात मृत्यू

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : मुंबई – 1990 मध्ये गाजेलल्या अत्यंत लोकप्रिय अशा टार्झन या सीरिजमध्ये मुख्य भूमिका साकारणारे अभिनेते विलियम जोसेफ लारा, म्हणजेच जो लारा यांचे विमान दुर्घटनेत निधन झाल्याची माहिती समोर येत आहे.

स्थानिक वेळेनुसार शनिवारी सकाळी ११ वाजता त्यांच्या विमानाने फ्लोरिडाच्या पाम बीच, टेमिनी विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच हा अपघात घडला. लहे विमान नॅशविलच्या दक्षिणेस १९ किलोमीटर असणाऱ्या पर्सी प्रिस्ट तलावामध्ये कोसळले. सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, फेडरल एव्हिएशन अ‍ॅडमिनिस्ट्रेशनने विमानात सात जण होते. जो लारा यांच्यासह त्यांची पत्नीदेखील होती.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळाल्यानंतर बचावकार्य सुरू करण्यात आले. शनिवारी रात्रीपर्यंत शोध आणि बचावकार्य सुरू असल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतर शनिवारी रात्री उशिरा पीडितांची ओळख पटवण्यात आली आहे. त्यानंतर रविवारी सापडलेल्या विमानाच्या अवशेषामध्ये मृतदेह सापडले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.