
ज्ञानदीप बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेतर्फे किन्नर समाज , दिव्यांग व बंदीवानांच्या परिवारास मदतीचा हाथ
विदर्भ वतन न्यूज पोर्टल,नागपूर –कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेले लॉकडाऊन आणि संचारबंदी मूळे अनेक कुटुंबावर हाताला काम नसल्यामुळे उपासमारीची वेळ आली. अश्या कठीण प्रसंगी ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ या सेवाभावी संस्थेने माणुसकीचा हाथ दिला.भावना सी एस जनबंधू या संस्थेच्या संचालिका असून त्यांनी आतापर्यंत २०० हुन अधिक किन्नर व्यक्तींना २ महिने पुरेल एवढे धान्य आणि किराणा वितरित केला आहे बरेचदा न केलेल्या गुन्ह्यासाठी सुद्धा बऱ्याच निरपराध लोकांना कारागृहात शिक्षा भोगावी लागते आणि बऱ्याच कालवधीनंतर काही कैद्यांना त्याच्या चांगल्या वर्तणुकीमुळे पॅरोल मिळतो. ज्यात ते १५-२० दिवसांच्या सुट्टीवर त्यांच्या घरी जाऊ शकतात व हाताला मिळेल ते काम करून पैसे जमवून परिवाराला देतात. पण लॉकडाऊनमुळे सध्या कुणालाच काम मिळत नसल्याने अशा कैद्यांच्या परिवारावर उपासमारीचे संकट दिसू लागताच ज्ञानदीप बहू उद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेने पुढाकार घेऊन नागपूर सेंट्रल जेलचे कर्मचारी धनपाल मेश्राम यांच्या सहयोगाने गरजू कैदी व त्यांच्या परिवारास धान्याचे किट वाटप केले. याबरोबरच अपंग व्यक्तींना या संस्थेने आधार दिलाय.त्यांनासुद्धा अविरतपणेधान्य किटस्चे वितरण चालू आहे.
मागील २ महिन्या पासून रोज १००० लोक्कांना शिजवलेले जेवण सुद्धा वाटप करणे चालू आहे असे या संस्थेच्या संचालिका भावना सी एस जनबंधू यांनी सांगितले. या मानवतेच्या करण्यासाठी धान्याच्या व पैशाच्या स्वरूपात दान करू इच्छित असल्यास 888899037 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन भावना जनबंधू यांनी केले आहे.

