Home इतर असोसिएशन ऑफ प्रोग्रेसिव्ह एम्पलॉइज इंडिया- एपीईआय नागपूर तर्फे गरजू कलावंतांना धान्य किटचे...

असोसिएशन ऑफ प्रोग्रेसिव्ह एम्पलॉइज इंडिया- एपीईआय नागपूर तर्फे गरजू कलावंतांना धान्य किटचे वाटप

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/9638*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

89 views
0

असोसिएशन ऑफ प्रोग्रेसिव्ह एम्पलॉइज इंडिया- एपीईआय नागपूर तर्फे गरजू कलावंतांना धान्य किटचे वाटप

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर- कोरोना महामारीमुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत अनेकांचे रोजगार हिरावून घेतले. सर्वच प्रकारच्या मनोरंजन कार्यक्रमावर बंदी असल्यामुळे लोकगीते, नाटक ,संगीत-गायन कार्यक्रमामध्ये काम करणाऱ्या कलावंतांना काम नसल्यामुळे घर चालवणे कठीण झाले आहे.  सदर कलावंतांची अडचण सोडवण्यासाठी   असोसिएशन ऑफ प्रोग्रेसिव्ह एम्पलॉइज इंडिया- एपीईआय  या  या देशव्यापी पुरोगामी विचारांच्या  कर्मचा-याच्या संघटनेनेच्या नागपूर शाखेने पुढाकार घेतला आहे.

   कलावंतांच्या   हलाखीची आर्थिक , मानसिक व कौटुंबिक परिस्थितीचा विचार करून संघटनेने सदस्यांकडून प्रत्येकी  500 ते 1,000 रुपये वर्गणी जमा केली. 30 कलावंतांच्या कुटुंबाला किमान 15 ते 20 दिवस पुरेल इतके गव्हाची कणिक, तांदुळ, डाळ, तेल, मीठ मिरची मसाला असेलेले धान्याची किट तसेच मास्क  कलावंतांना सुपूर्द केली.  धान्याचे  किट तयार करण्यासाठी  डॉ.भावना वानखेडे, प्रा.विलास तेलगोटे आणि मोहन गजभिये यांनी   सक्रीय  सहभाग घेतला तर निधी जमा करण्यासाठी तेजस्विनी गवई,रितेश गोंडाने, भैसारें, डॉ. नगराळे, राहुल साळवे, सुनील उमरे, धनराज बडोले,नागेश बुरबुरे,डॉ. सोमकुवर, रेखा भवरे, डॉ सुनीता सूर्यवंशी, पी वि पठाडे, अरुण भगत,महेंद्र ढवळे, राजन तलमले, जितेंद्र सराडे ह्यांनी पुढाकार घेतला.मागील एक वर्षापासून  कोरोनाच्या कठीण काळात  एपीईआय ही संघटना देशाच्या 4  राज्यात तर महाराष्ट्रच्या 10  जिल्ह्यामध्ये डॉ.  किशोर मानकर  (भा.व.से.) यांच्या मार्गदर्शनात सामाजिक कार्य करत आह.