पदविधर अंशकालीन उमेदवारांना कंञाटी कामावर रुजु करा

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/9624*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

133

पदविधर अंशकालीन उमेदवारांना कंञाटी कामावर रुजु करा

पदविधर अंशकालीन कर्मचारी संघटनेच्या वतीने निवेदनातुन करण्यात आली मागणी 

विदर्भ वतन, लाखांदुर : केवळ १० रुपये प्रतिदिन मजुरीने तीन वर्षे शासकीय कार्यालयात मजुरी केली माञ कालांतराने शासनाने कामावरुन कमी केल्याने त्यामुळे सबंधित पदविधर अंशकालीन कर्मचारी अत्यंत बिकट परीस्थितीत जगत असल्याने पदविधर अंशकालीन उमेदवारांना कंञाटी कामावर रुजु करा अशी मागणी निवेदनातुन करण्यात आली आहे. सदर मागणीचे निवेदन गत २७ मे रोजी नागपुर पदविधर मतदार संघाचे आमदार अभिजीत वंजारी यांना पदविधर अंशकालीन कर्मचारी संघटनेच्या वतीने देण्यात आले.
प्राप्त निवेदनानुसार, केवळ १० रुपये प्रतिदिन मजुरीने तीन वर्षे शासकीय कार्यालयात मजुरी केली माञ कालांतराने शासनाने कामावरुन कमी केले. सबंधित पदविधर अंशकालीन कर्मचारी अत्यंत बिकट परीस्थितीत जगत आहेत. तालुक्यातील पदविधर अंशकालीन उमेदवारांना कंञाटी पद्धतीने तहसिल कार्यालयात, पं स कार्यालयात व भुमी अभिलेख कार्यालयात कामावर रुजु करा अशी मागणी निवेदनातुन केली आहे.
भंडारा सेवायोजन विभागाने गत १२ एप्रिल रोजी सर्व कार्यालय प्रमुखांना पञ पाठवुन रिक्त जागी पदविधर अंशकालीन कर्मचारी यांची रिक्त पदावर नेमणुक करण्याचे कळविले आहे. तालुक्यातील पदविधर कर्मचारी गत १७ वषार्पासुन संघटनेतर्फे शासनाला निवेदने सादर करुन आपल्या मागण्या मांडत आले आहेत माञ प्रशासनाने अद्याप कसलीही दखल घेतली नाही.
तथापी अभिजीत वंजारी यांना अंशकालीन कर्मचा-यांच्या वेदना, हालअपेष्ठा, आर्थिक स्थिती ह्या सर्व बाबिंची सखोल अभ्यास असुन आपण तात्काळ लक्ष घालुन तालुक्यातील पदविधर अंशकालीन कर्मचा-यांना कंञाटी पद्धतीने तहसिल कार्यालयात, पं स कार्यालयात व भुमी अभिलेख कार्यालयात कामावर रुजु करा अशी मागणी निवेदनातुन केली आहे.
सदर मागणीचे निवेदन देतेवेळी प्रदिप शेंडे, विकास हुमणे, विजय कुडेगावे यांसह अन्य पदविधर अंशकालीन कर्मचारी उपस्थित होते.