म्युकरमायकोसिस मध्ये शेतक-यांनी काळजी घ्यावी – उपजिल्हाधीकारी मिनल कळसकर.

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/9618*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

176

म्युकरमायकोसिस मध्ये शेतक-यांनी काळजी घ्यावी – उपजिल्हाधीकारी मिनल कळसकर.

विदर्भ वतन, नागपूर : शुक्रवारी मा. उपजिल्हाधीकारी मिनल कळसकर यांच्या अध्यक्षतेखाली गट-ग्रामपंचायत पिपळा (घोगली) येथे म्युकरमायकोसिस बाबतीत एक दिवसीय कार्यशाळा राबविण्यात आली.
कोवीड -19 च्या तिस-या लाटेची शक्यता बघता घ्यायच्या काळजी बद्दल गावातील नागरिकांना मार्गदर्शन केले. त्यावेळेस मोठ्या संख्येत गावकरी उपस्थित होते.
यावेळी नायब तहसीलदार मा. नितीन धाबसे (पाटील), मंडल अधिकारी मा. दिलीप खुळगे, सरपंच नरेश भोयर, पंचायत समिती सदस्य सौ. वैशालीताई भोयर, उपसरपंच प्रभू भेंडे, ग्रामसेवक ज्ञानेश्वर धारपूरे, तलाठी विकास सावरकर, ग्रामपंचायत सदस्य अभिषेक ढोणे, सुनील राहाटे, सौ. वनीताताई कावळे, सौ. वैशालीताई पांडे. मुख्याध्यापक मंडपे सर, आणी मेश्राम सर आदी प्रामुख्खाने उपस्थित होते. कार्यशाळेला यशस्वी करण्याकरीता अंगणवाडी सेविका प्रेमलता म्हैरसकोल्हे, शुभांगी मते, श्रीमती. ठाकरे, श्रीमती. बागळे, दिलीप लेंढे, गिरीश राऊत, मुकेश ईंगळे. सुरेश बागडे, आदीनी परीश्रम घेतले.