Home नागपूर अखिल विदर्भ तेली समाज संघटने द्वारा कोरोना रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना भोजन वाटप

अखिल विदर्भ तेली समाज संघटने द्वारा कोरोना रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना भोजन वाटप

0
अखिल विदर्भ तेली समाज संघटने द्वारा कोरोना रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना भोजन वाटप

अखिल विदर्भ तेली समाज संघटने द्वारा कोरोना रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना भोजन वाटप

विदर्भ वतन, नागपूर : अखिल विदर्भ तेली समाज संघटनेच्या वतीने मेडिकल कॉलेज नागपूर येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अरूण धांडे यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त संघटनेचे मार्गदर्शक नगरसेवक सतिश देऊळकर व प्रज्ञाताई बडवाईक यांच्या हस्ते येणा-या रूग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना भोजनाचे पॅकेट वाटण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यापुढे असेच भोजन वाटपाचा उपक्रम राबविण्यात येईल. असा संस्थेचा मानस आहे. अखिल विदर्भ तेली समाज संघटना व वर-वधू संचालक मंडळ, विदर्भ विभाग महाराष्ट्र राज्य हि संघटना समाजाच्या माध्यमातून वर-वधू यांचे बॉयोडाटे वाट्स्पप गृपच्या माध्यमातून लग्न जुळणीचे, समाजाचे विविध क्षेत्रात काम करणा-या समाज बांधवांची व्याख्यानमाला आयोजित करण्यात येणार आहे. तसेच लहान मुलांकरिता चित्रकला स्पर्धा, वकृत्व स्पर्धा आयोजित करून त्यांचा गुणगौरव करण्यात येईल. याप्रसंगी महासचिव राजेश कारमोरे, महासचिव देवेश गायधने, उपाध्यक्ष किशोर भिवगडे, महिला उपाध्यक्ष गिताताई महाकाळकर, सामाजिक कार्यकर्ते कृणाल पुरी, विकास अर्बन क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष दिलीप सुरकर व संचालक सुभाष ढगे, प्रदिपाताई हटवार, बबनराव तेलरांधे, वसंतराव खोड, सोहन सातपुते, चंन्दुजी वंजारी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.