Home Breaking News शहीद जवान प्रमोद कापगते यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

शहीद जवान प्रमोद कापगते यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/9588*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

183 views
0

शहीद जवान प्रमोद कापगते यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

विदर्भ वतन, सडक अर्जुनी : तालुक्यातील परसोडी येथील सीआरपीएफचे जवान प्रमोद कापगते याला नागालँडच्या सीमेवर कर्तव्यदरम्यान वीरमरण आले. दरम्यान, आज (ता.२७) सकाळी ११ वाजता त्यांचे पार्थिव परसोडी येथे आणण्यात आले. दुपारी २ वाजता सुमारास अंत्ययात्रा काढून शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंतयात्रेत अधिकारी, जनप्रतिनिधींसह हजारोच्या संख्येत आप्तेष्ठित सहभागी झाले.
सडक अर्जुनी तालुक्यातील परसोडी येथील भाजपचे माजी तालुकाध्यक्ष विनायक कापगते यांचे ज्येष्ठ पुत्र प्रमोद कापगते हे २0 वर्षांपासून केंद्रीय राखीव बलात सेवेत होते. नागालँड येथे सेवादरम्यान कर्तव्यावर असताना २५ मे रोजी झालेल्या गोळीबारात सैनिक प्रमोद कापगते यांना वीरमरण आले. या घटनेची माहिती मिळताच सडक अजुर्नी तालुक्यात एकच शोककळा पसरली. गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास शहीद प्रमोद कापगते यांचे पार्थिव परसोडी गावात आणण्यात आले. दरम्यान, अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. यानंतर शासकीय शिष्टाचाराने अंत्ययात्रा काढण्यात आली. या अंत्ययात्रेत हजारोच्या संख्येत आप्तेष्ठित सहभागी झाले होते. गावातील मोक्षधामात शासकीय इतमामात शहीद प्रमोद कापगते यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हजारोच्या संख्येत सहभागी झालेल्या आप्तेष्ठितांनी शहिद जवानाला सर्शूंनी निरोप दिला.