Home नागपूर प्रा. शिलवंतकुमार मडामे यांची विभागीय अध्यक्षपदी निवड. 

प्रा. शिलवंतकुमार मडामे यांची विभागीय अध्यक्षपदी निवड. 

0
प्रा. शिलवंतकुमार मडामे यांची विभागीय अध्यक्षपदी निवड. 

प्रा. शिलवंतकुमार मडामे यांची विभागीय अध्यक्षपदी निवड.

विदर्भ वतन, भंडारा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र राज्य या साहित्यिक विचारमंचच्या नागपूर विभागीय अध्यक्षपदी भंडारा जिल्ह्य़ातील कवी, प्रबोधनकार, गायक, साहित्यिक प्रा. शिलवंतकुमार मडामे यांची त्यांच्या सामाजिक साहित्यिक कार्याची दखल घेऊन नुकतीच  निवड करण्यात आली.
प्रा. शिलवंतकुमार मडामे सध्या ग्रामविकास कनिष्ठ महाविद्यालय कोंढी /जवाहरनगर येथे कार्यरत आहेत. विभागातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर व वर्धा या सहा जिल्ह्य़ाचे   ते प्रतिनिधित्व करणार आहेत.
प्रा. मडामे यांची  नियुक्ती महाराष्ट्र  साहित्यिक विचारमंचचे संस्थापक  व समुह प्रमुख मनोज जाधव, सुरेश कुराडे, सुनील सुरेखा, जितेंद्र  मोहिते यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली.
त्यांच्या या निवडीबद्दल डॉ. सुरेश खोब्रागडे, प्रा. सुरज गोंडाणे, प्रभाकर तांडेकर ‘प्रदत्त’, शशिकांत भोयर, महेंद्र गोंडाणे, समाजमित्र नाशिकभाऊ चवरे, उषाताई घोडेस्वार, रतन लांडगे, भावेश कोटांगले, सुभाष मानवटकर, रजनीताई कांबळे, भावना खोब्रागडे, प्रणिता राजुरकर व समस्त सहाही जिल्ह्य़ातील कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांनी व स्नेहीजनांनी त्यांचे अभिनंदन  करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा  प्रदान  केल्यात.