शांतिदुत बुद्ध – युवराज गोवर्धन जगताप

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/9578*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

160

 शांतिदुत बुद्ध

शुद्धोधन पिता।मायादेवी माता ।
करुणा विधाता । जन्मे बुद्ध।।
क्षत्रियांचे कूळ ।जन्मले ते बाळ ।
वैभवाचा काळ । बुद्धा पायी ।।
त्याग सर्वस्वाचा। वसा तपस्येचा ।
पार पिंपळाचा ।दिव्यत्वास ।।
कशा हवे युद्ध ।आचरण शुद्ध ।
उपाधी ही बुद्ध ।गौतमास।।
पाली या भाषेत ।सत्य अभिप्रेत।
तत्वज्ञान देत।  जनतेस ।।
रूढी परंपरा ।शोषणाचा वारा ।
दिला नाही थारा । भेद भावे ।।
भूतकाळ खोडा ।भविष्यास सोडा।
वर्तमान जोडा । आयुष्याशी।।
धिक्कार हिंसेचा।हेका अहिंसेचा ।
आग्रह सत्याचा। बुद्ध तत्व ।।
जगाच्या कल्याणा।शांतता पेरण्या।
समता साधण्या। देह वाही।।
अष्टांग जाणुनी । विकार त्यागुणी।
त्रिरत्न माणुनी  । घ्यावे ज्ञान  ।।
गौतम विचार । जीवन सुकर ।
कास तया धर । सांगे युवा ।।

– युवराज गोवर्धन जगताप

     काटेगाव ता :- बार्शी
     जिल्हा:- सोलापूर
     940523708