Home Breaking News भारतात आतापर्यंत एकूण ११,७१७ जणांना ब्लॅक फंगसची लागण

भारतात आतापर्यंत एकूण ११,७१७ जणांना ब्लॅक फंगसची लागण

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/9552*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

51 views
0

भारतात आतापर्यंत एकूण ११,७१७ जणांना ब्लॅक फंगसची लागण

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : नवी दिल्ली – देशावर कोरोनाचे संकट असतानाच ‘म्युकोरमायकोसिस’नेही थैमान घातले आहे. देशात आतापर्यंत एकूण ११ हजार ७१७ जणांना ब्लॅक फंगसची लागण झाल्याचे समोर आले आहे. यात सर्वाधिक रुग्ण गुजरात आणि महाराष्ट्रातील आहेत.

देशात ब्लॅक फंगसचे रुग्ण वाढत असल्याने आरोग्य मंत्रालयानेही चिंता व्यक्त केली आहे. यासाठी अनेक राज्यांनी ब्लॅक फंगसला साथीचा आजार घोषित केले आहे. तसेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ब्लॅक फंगस झालेल्या रुग्णांची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यात २५ मे २०२१ रोजी रात्री ९.३० वाजेपर्यंतची आकेडवारी देण्यात आली आहे.

केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांनी ट्वीट करत ही आकडेवारी दिली आहे. गुजरातमध्ये २८५९, महाराष्ट्रात २७७० आणि आंध्र प्रदेशमध्ये ७६८ ब्लॅक फंगसच्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिल्लीत ब्लॅक फंगसची ६२० प्रकरणे असल्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. मात्र केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या आकडेवारीत ही संख्या ११९ इतकी दिसत आहे. तसेच कर्नाटकमध्ये ४८१, हरियाणात ४३६, तामिळनाडूत २३५, बिहारमध्ये २१५, पंजाबमध्ये १४१, उत्तराखंडमध्ये १२४ आणि छत्तीसगडमध्ये १०३ रुग्ण आहेत. तर चंदीगडमध्ये ८३, गोव्यात १० रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त अनेक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात ब्लॅक फंगसचा एकही रुग्ण आढळलेला नाही. अंदमान निकोबार बेट, अरुणाचल प्रदेश, आसाम, लडाख, लक्षद्वीप, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, सिक्किममध्ये एकही रुग्ण नाही. त्याचबरोबर पश्चिम बंगाल आणि दमन द्वीपची माहिती यात देण्यात आलेली नाही.