Home Breaking News कोरोनामुळे जेईई ऍडव्हान्स्ड परीक्षा लांबणीवर

कोरोनामुळे जेईई ऍडव्हान्स्ड परीक्षा लांबणीवर

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/9547*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

76 views
0

कोरोनामुळे जेईई ऍडव्हान्स्ड परीक्षा लांबणीवर

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : नवी दिल्ली – देशभरात कोरोना विषाणूचे थैमान सुरू असल्याने 3 जुलै 2021 रोजी आयोजित करण्यात आलेली आयआयटी प्रवेश परीक्षा जेईई ऍडव्हान्स्ड स्थगित करण्यात आली आहे. आता ही परीक्षा कधी घेतली जाईल याबाबत अद्याप कुठलीही माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, यंदा कोरोनामुळे जेईई मेन्स परीक्षादेखील घेण्यात आलेली नाही.

देशभरात जेईई ऍडव्हान्स्ड 2021 परीक्षा 3 जुलै 2021 रोजी घेतली जाणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी ट्विटरवरून दिली होती. यावर्षी विद्यार्थ्यांना आयआयटीमध्ये प्रवेश घेताना 75 टक्केची पात्रता शिथिल करण्यात आल्याचेदेखील पोखरियाल यांनी त्यावेळी सांगितले होते. मात्र आता कोविड-19मुळे ही परीक्षा स्थगित करण्यात आली असून परीक्षेच्या सुधारित तारखेची घोषणा योग्य वेळी करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे. कोरोना महामारीचे संकट पाहता नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) सध्या परीक्षा आयोजित करण्यासाठी सज्ज नाही, असे म्हटले जात आहे.

महत्त्वाचे म्हणजे देशातील 23 आयआयटीमध्ये प्रवेश घेण्यासाठी जेईई ऍडव्हान्स्ड 2021 परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना जेईई मेन्स 2021 परीक्षेला सामोरे जावे लागते. यावर्षी 4 सत्रात ही परीक्षा देण्यास विद्यार्थ्यांना सवलत दिली गेली होती. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे या चार सत्रात जेईई मेन्स परीक्षा घेतल्या जाणार होत्या. मात्र या परीक्षांना यंदा स्थगित करण्यात आले आहे.