Home Breaking News अखेर राज भवनातच सापडली राजभवनातून हरवलेली १२ नावांची यादी !

अखेर राज भवनातच सापडली राजभवनातून हरवलेली १२ नावांची यादी !

0
अखेर राज भवनातच सापडली राजभवनातून हरवलेली १२ नावांची यादी !

अखेर राज भवनातच सापडली राजभवनातून हरवलेली १२ नावांची यादी !

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : मुंबई – महाविकास आघाडी सरकारने राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीसाठी दिलेली नावांची यादी राजा भवनातून हरवल्याचे माहिती अधिकारातून स्पष्ट झाले होते. मात्र ही बारा नावांची यादी हरवलेली नाही. ती राजभवनामध्ये सुरक्षित असल्याचे राजभवनाच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले आहे. त्यामुळे दोन दिवस उठलेले वादळ आता शमले आहे.
महाविकास आघाडी सरकारने राज्यपाल नामनियुक्त विधानपरिषदेच्या १२ आमदारांच्या नावांची यादी ६ नोव्हेंबर २०२० रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिल्ली. सरकारमधील मंत्री नवाब मलिक अमित देशमुख आणि अनील परब यांनी ही यादी राज्यपालांच्या हातात सोपविली होती. सहा महिने उलटले तरी
राज्यपालांनी या १२ नावांना अद्याप मंजुरी दिलेली नाही व त्यावर कुठलाही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे राज्यपाल विरुद्ध सरकार असा वादही रंगला होता. आता हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेले आहे. त्यातच माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी ही १२ जणांची यादी राज्यपाल सचिवालयाकडे मागितली होती. मात्र अशी यादी राजभवनाकडे उपलब्ध नसल्याचे राजभवन सचिवांनी त्यांना उत्तर दिले होते.
त्यानंतर गेले दोन दिवस महाराष्ट्रात या गहाळ झालेल्या यादीवरून वादळ उठले होते. आता याबाबत
राजभवन कार्यालयातील अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले आहे की, गोपनीयतेच्या कारणास्तव राजभवनाला ही १२ नावांची यादी माहिती अधिकार कार्यकर्त्याना देणे शक्य नव्हते. महाविकास आघाडी सरकारने देखील या बारा जणांची नावे अधिकृतपणे जाहीर केलेली नव्हती. त्यामुळे राजभवनातही गोपनीयतेच्या सदरात मोडणारी ही यादी कोणाला देणे किंवा जाहीर करणे शक्य नव्हते.