Home Breaking News कोरोना दरम्यान गेल्या दोन वषार्पासून ट्रान्सपोर्ट व्यवसाय ठप्प.

कोरोना दरम्यान गेल्या दोन वषार्पासून ट्रान्सपोर्ट व्यवसाय ठप्प.

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/9507*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

161 views
0

कोरोना दरम्यान गेल्या दोन वषार्पासून ट्रान्सपोर्ट व्यवसाय ठप्प.

– शासनासमोर मदतीची हाक

विदर्भ वतन, नागपूर : भंडारा रोड कापशी येथील पारडी येथे युनियनच्या आॅफिसमध्ये पत्रपरिषदेत नागपूर ट्रेलर ओनर्स यूनियन तर्फे शासनाला आर्थिक मदतीची मागणी करीत असून संपूर्ण महाराष्ट्रभर गेल्या 2 वर्षात कोरोना काळात होरपळून निघतोय, देशाच्या विकासात आपले सक्रिय सहभाग नोंदविणा-या ट्रान्सपोर्ट व्यवसायाला आता मात्र घरघर लागलेली असल्याचे मत यूनियनचे अध्यक्ष शैलेंद्र मिश्रा यांनी व्यक्त केले. सध्या ज्या परिस्थीतीत हा व्यवसाय आहे. यात सर्व परिस्थिती ही विरोधातच असल्या सारखी आहे. इंधनाचे भाव दिवसेंदिवस वाढतच आहेत, ट्राफीक व आरटीओ पोलिसांचा मनमानी कारभार, त्रासात भर घालतोय, सोबतच जागोजागी ई-चालानच्या पाठवण्याची शर्यत लागली आहे. काम कमी असल्यामुळे कमी किरायाने काम करावे लागत आहे. गाड्यांचे हफ्ते थांबल्यामुळे गाडया सीज करण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकारामुळे ट्रान्सपोर्ट व्यवसायी पूर्णपणे मानसिक आणि आर्थिक बाजूंनी मागे आलेला आहे. हे एकमात्र असे क्षेत्र आहे जिथे एडव्हांस टॅक्स भरुन व्यवसाय केला जातो. तरी आज ही स्थिती आहे की, शासन दरबारी या क्षेत्राची मागील 2 वर्षात शासन अनेक व्यवसायांना आर्थिक पॅकेजच्या माध्यमातून मदत करत आहे. अश्यावेळी या क्षेत्राला शासनातर्फे बैंक हस्ते, बॉर्डर टॅक्स मध्ये शिथिलता देण्यात यावी व या व्यवसायाला सुगीचे दिवस येण्यासाठी मदत करावी. अशी नागपूर ट्रेलर ओनर्स यूनियन तर्फे शासनाला हाक दिली आहे.