“कोरोना लसीकरण आणि आत्मनिर्भर भारत जनजागृती महाभियानाच्या चौथ्या चरणाची सुरवात “

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/9503*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

240

“कोरोना लसीकरण आणि आत्मनिर्भर भारत जनजागृती महाभियानाच्या चौथ्या चरणाची सुरवात “

विदर्भ वतन, नगपूर : कोरोना लसीकरण आणि आत्मनिर्भर भारत जनजागृती महाअभियानाच्या चौथ्या चरणाची सुरवात झाली असून या अंतर्गत ग्रामीणस्तरावर जनजागृती व्हावी ह्याकरिता भारत सरकारच्या सूचना व प्रसारण मंत्रालय, क्षेत्रीय लोक संपर्क ब्युरो, नागपूर, गीत व नाटक विभाग (महाराष्ट्र व गोवा ) तर्फे नागपुर जिल्ह्यातिल उमरेड, भिवापूर व कुही तालुक्यात राबविण्यात येत आहे. या अभियाना अंतर्गत बहु माध्यम प्रदर्शनी द्वारे आणि गीत नाटक चमू , राष्ट्रभाषा परिवार सामाजिक सांस्कृतिक संस्था, नागपुर यांच्या वतीने 25 मे 2021 रोजी ग्राम पंचायत मानोरा, तहसील भिवापूर , जिल्हा -नागपूर येथे पुष्पक भट व ओमकार लांडगे यांनी श्री. मिथुन जीवन माटे ( प्रभारी सरपंच , मानोरा , तहसिल भिवापूर ) , श्री प्रबोध गोमकर ( ग्रां. प सदस्य ), श्री उत्तम भरडे आणि इतर सहकारी यांच्या उपस्थितीत उत्कृष्ट रित्या पथनाट्य सादर केले. कोरोना लसीकरण, कोविड नियमांचे पालन करणे, काळी बुरशी पासून संरक्षण करण्यासाठी पथनाट्यातून जनजागृती करण्यात आली. गावातील नागरिकांचा सदर कार्यक्रमास उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. सदर अभियान क्षेत्रीय लोक संपर्क ब्युरो , कोल्हापूरचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत, नागपुरचे संजय तिवारी, संजीवनी निमखेड़कर ह्यांच्या मार्गदर्शना खाली राबविल्या जात आहे.