Home नागपूर तथागत

तथागत

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/9492*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

113 views
0

तथागत

पिंपळाचे खाली
समाधिस्त झाली
ज्ञानांबून आली
तथागता!

संसाराचे दु:ख
नश्वर हे सुख
अज्ञानाची राख
करावया!

राजबिंड रूप
अशोकाचे स्तुप
वास्तविक धूप
जाळावया!

काव्यमय लेणी
कलाकार छन्नी
करूणेची वाणी
तथागत!

प्रशांत नामदेवराव ढोले
श्रावस्ती नगर, पो-सावंगी (मेघे)
ता.जि.वर्धा
पिन नंबर 442107
संवाद:9923308638