डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंचच्या नागपूर जिल्हा उपाध्यपदी प्रभाकर तांडेकर यांची निवड

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/9486*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

251

डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंचच्या नागपूर जिल्हा उपाध्यपदी प्रभाकर तांडेकर यांची निवड

विदर्भ वतन, नागपूर- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायी आहे. देशाला त्यांनी राज्यघटना दिली. त्यात त्यांनी स्वातंत्र्य,समता, बंधुता,न्याय या मानवी मूल्यांची रुजवण केली. वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था,भेदभाव,कर्मकांड,बुवाबाजी,अंधश्रद्धा यांनी बरबटलेल्या समाजाला ज्ञानाचा सूर्य दाखवण्याचे काम केले.त्यांचे मानवमुक्तीचे विचार साहित्यातून पेरण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच,महाराष्ट्र या समूहाच्यावतीने नागपूर जिल्हा कार्यकारिणी खालीलप्रमाणे गठीत करण्यात आली.
जिल्हाध्यक्ष- मा.सुभाष मानवटकर,उपाध्यक्ष- रजनी कांबळे/मा.प्रभाकर तांडेकर ‘प्रदत्त’,सचिव- अर्चना चव्हाण,सहसचिव- डॉ.वीणा राऊत,
कार्याध्यक्ष- अल्का चौकीकर, कोषाध्यक्ष- भूषण भस्मे,नागपूर जिल्हा मार्गदर्शक/विभागीय अध्यक्ष- प्रा.शीलवंतकुमार मडामे,नागपूर जिल्हा मार्गदर्शक- मा.जगदीश राऊत,नागपूर जिल्हा संघटक- मा.हेमंत गांजरे/रीना गायकवाड/प्रणिता राजूरकर,प्रसिद्धी प्रमुख- प्रियंका वाकडे,कार्यकारिणी सदस्य- मा.जीवन खोब्रागडे/मा.अस्तीन चौरे/मा.विलास गजभिये/ संध्या राजूरकर, नागपूर जिल्हा ग्राफिक्सकार- यशस्वी तळखंडे,शुभेच्छुक:- संस्थापक मा.मनोज जाधव(रत्नागिरी) मा.प्रा.सुरेश कुराडे (सिंधुदुर्ग), मा.सुनील सुरेखा, मा.जितेंद्र मोहिते(रत्नागिरी), मा.विनोद जाधव (कोकण विभागीय अध्यक्ष). प्रभाकर तांडेकर यांच्या निवडीबद्दल आके. के. प्रकाशनचे कलाम अहमद खान, विदर्भ वतनचे मुख्य संपादक गोपाल कडूकर, संपादक अजय बिवडे यांनी अभिनंदन केले.