अशी ही एक चतुर नार, 13 नव-यांना लुटून झाली पसार

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/9482*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

229

अशी ही एक चतुर नार, 13 नव-यांना लुटून झाली पसार

विदर्भ वतन न्यूज पोटल,वृत्तसंस्था/नंदुरबार : लग्न म्हंटलं की, एकमेकांवरचा विश्वास असतो. दोन कुटुंबं एकत्र येतात आणि नवी नाती निर्माण होतात. पण, लग्न म्हणजे फसवणुकीचा धंदा आणि मुलाकडील लोकांना निव्वळ लुटणे, असं समजत एका मुलीने आणि तिचा साथीदारांनी तब्बल १३ मुलांशी लग्नं केली. लाखो रुपये लुटले. मात्र, १४ व्या लग्नात मात्र, पोलिसांच्या जाळ्यात ही टोळी सापडली.
सविस्तर बातमी अशी की, सोनू उर्फ पूजा शिंदे असं या मूळ तरुणीचे नाव आहे. नंदुरबार जिल्हयातील शहादा तालुक्यातील मंदाणे गावातील एका तरुणासोबत तिचे लग्न झाले होते. हे लग्न एका दलालाच्या माध्यमातून झाल्यामुळे नव-या मुलाकडून १ लाख ३0 हजार इतकी रक्कम सोनूच्या घरातील मंडळींना दिलेली होती. ५ मे रोजी लग्न झाले आणि १५ मे रोजी सोनू घरातून पहाटे रोख रक्कम आणि दागिने घेऊन फरार झाली. म्हणजे केवळ १0 दिवसांमध्ये ही मुलगी फरार झाली होती. यासंदर्भात नवरा मुलगा भूषण सैदाणे यांने पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर काही दिवसांनी भूषणला त्याच्या नातेवाईकांकडून फोन आला आणि त्यांनी सांगितले की, तुज्या बायकोसारखी दिसणा-या मुलीचे लग्न बेटावदमधील कपिलेश्वर मंदिरात होणार आहे, असे सांगितले. भूषणने ही माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी बेटावद येथे जाऊन चौकशी केली असता असे कळले की, नुकतेच लग्न झालेले आहे. लग्नातील मंडळी स्नेहभोजन घेत आहेत. पोलिसांनी लग्नाच्या ठिकाणी जाऊन सोनू उर्फ पूजा शिंदे, तिची आई वंदना राजू शिंदे, रविंद्र गवबा गोपाळ, योगेश संजय साठे, विक्की राजेश कांबळे, या पाच जणांना ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान माहिकी कळली की, बेटावद येथूनही सोनू आणि तिच्या सहका-यांनी ५0 हजार घेतल्याचे समोर आले. इतकेच नाही, तर या टोळीने तब्बल १३ लग्न करून नव-या मुलाकडील लोकांना गंडा घातल्याचे कबूल केले. या टोळीतील २ दलाला फरार असून पोलिस त्यांचा तपास करत आहेत.